भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध भारताला कसोटी, वनडे आणि टी-20 प्रकारातील एकून 10 सामने खेळायचे आहेत. हा दौरा संपल्यानंतर संघ आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला नवीन कर्णधार मिळण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेतून विश्रांती मिळेल, असेही सांगितले जात आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान खेळली जाईल. त्यानंतर उभय संघातील पाच टी-20 सामन्यांची मालिका 3 ते 13 ऑगस्टदरम्यान खेळवली जाईल. भारताचा आयर्लंड दौरा 18 ते 23 ऑगस्ट, या 6 दिवसांचा असेल. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनाही आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. अशात सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतो.
माध्यमांतील वृत्तांनुसार संघ व्यवस्थापन सूर्यकुमार यादवला आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाचा कर्णधार बनवण्याच्या विचारात आहे. सूर्यकुमार वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. आगामी काळात भारतीय आशिया चषक आणि वनडे विश्वचषक खेळायचा आहे. अशात वरिष्ट खेळाडूंची फिटनेस संघासाठी महत्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित आणि हार्दिक यांना आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती दिली जाणार, असल्याचे सांगितले जात आहे.
आयर्लंड दौऱ्यात कर्णधारपदासाठी सूर्यकुमारचे नाव चर्चेत असले तरी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील ही भूमिका पार पाडण्यासाठी संघात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुमराह मागच्या मोठ्या कालापासून दुखापतीमुळे भारतासाठी खेळला नाहीये. पण बीसीसीआयच्या ताज्या माहितीनुसार त्याने आपली फिटनेस बऱ्यापैकी मिळवली आहे. असात आयर्लंड दौऱ्यासाठी तो संघात पुनरागमन करू शकतो. बुमराह जर संघात परतला, तर कर्णधारपद किंवा उपकर्णधारपद त्याच्याकडेही सोपवले जाऊ शकते.
संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Deravid) आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम रीठोड (Vikram Rathod) आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे ( गोलंदाजी प्रशिक्षक ) यांनाही आयर्लंड दौऱ्यात विश्रांती दिली जाणार, अशा बातम्या समोर आल्या आहेत. अशा परिस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख वीवीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनात संघ आयर्लंड दौरा पार पाडू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशने हिसकावला टीम इंडियाच्या विजयाचा घास! हरमन ब्रिगेडच्या हाराकरीने सामना टाय
“सध्या बेअरस्टो जगातील सर्वोत्तम फलंदाज”, दिग्गजाने मॅंचेस्टर कसोटीतील खेळीनंतर वाहिली स्तुतीसुमने