आपल्या फलंदाजीने जगभरातील क्रिकेटप्रेमींपासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधणारा खेळाडू म्हणजे भारताचा सूर्यकुमार यादव होय. सूर्यकुमारला चाहते नवीन ‘मिस्टर 360’ म्हणत आहेत. त्याने रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) दुसऱ्या टी20 सामन्यात 51 चेंडूत 111 धावांची वादळी खेळी साकारली होती. त्याच्या या यादगार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडला 65 धावांनी पराभूत केले होते. अशात आपल्या खास फलंदाजी शैलीमुळे जगभरातील खतरनाक फलंदाजांमध्ये सामील होत असलेल्या सूर्यकुमार यादवने यशाबद्दल वक्तव्य केले आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने चहल टीव्हीवर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्याशी संवाद साधला. त्याने यावेळी सांगितले की, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचे त्याच्या यशामध्ये मोलाचे योगदान राहिले आहे.
जगातील अव्वलक्रमांकाचा टी20 फलंदाज असलेला सूर्यकुमार म्हणाला की, “सचिन सर आणि विराट भाऊ यांच्याकडून खूप काही शिकलो. जेव्हा सचिन सर खेळायचे, तेव्हा मी फ्रँचायझीमध्ये त्यांच्यासोबत खेळत होतो. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. जेव्हाही आम्ही सोबत खेळतो, तेव्हा विराट भाऊकडून नेहमीच शिकतो. त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींमुळे फलंदाजीत खूप जास्त फायदा होतो, खूप चांगले वाटते.”
सचिन आणि विराटने केलेली सूर्याची प्रशंसा
न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली याने सूर्यकुमार यादव याची प्रशंसा केली. सचिनने या खेळीनंतर ट्वीट करत लिहिले की, “सूर्य रात्री आकाशात चमकला आहे. काय शानदार प्रदर्शन आहे सूर्यकुमार यादव.” दुसरीकडे, विराटनेही त्याच्या खेळीच्या वेगाची तुलना व्हिडिओ गेमशी करत त्याची प्रशंसा केली होती.
चहलने घेतली सूर्याची मुलाखत
‘चहल टीव्ही’ या युझवेंद्र चहलच्या खास शोमध्ये सूर्यकुमार यादवने म्हटले की, “मी खूप भाग्यवान आहे, कारण मला चहल टीव्हीवर येण्याची संधी मिळाली. या शोवर येऊन मला खूप चांगले वाटत आहे. चांगले वाटते, जेव्हा सर्व लोक मेसेज करतात ट्वीट करतात.”
From receiving appreciation from the likes of @sachin_rt & @imVkohli to answering the question of one lucky fan 🙌🏻 #NZvIND | @yuzi_chahal
The latest episode of Chahal TV features centurion @Surya_14kumar 😎 – By @ameyatilak
Full interview🔽https://t.co/Q1VRn7xrVW pic.twitter.com/dRNWJZJZh4
— BCCI (@BCCI) November 21, 2022
भारतीय संघाचा पुढील सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) नेपियर येथे खेळला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. (cricketer suryakumar yadav revelations his success story see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वत:साठी नाही, तर संघासाठी! धावा कुटण्याच्या नादात विक्रम मोडलाय हेच विसरून गेलेला जगदीशन, म्हणाला…
पंतची जागा घेण्यासाठी सज्ज झाला ‘हा’ यष्टीरक्षक, सलग 5 शतकांचा पाऊस पाडत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा