---Advertisement---

‘माझा एक पाय नकली…’, दुखापतग्रस्त असूनही मजा-मस्ती करायला विसरला नाही सूर्या, पाहा मजेदार Video

On: रविवार, डिसेंबर 24, 2023 10:16 AM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा दक्षिण आफ्रिका दौरा गाजवला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1ने बरोबरीत सोडवली. मात्र, यादरम्यान त्याला दुखापतीचा सामना करावा लागला. त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. सूर्याने आपल्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात दिसते की, त्याच्या पायाला प्लॅस्टर लावले आहे आणि तो काठीच्या मदतीने चालताना चालत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला पूर्णपणे बरे होऊन मैदानावर पुनरागमन करण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 आठवड्यांचा वेळ लागू शकतो. अशात तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही बाहेर होऊ शकतो. सूर्यकुमार अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताचा कर्णधार होता.

मात्र, दुखापतग्रस्त होऊनही सूर्यकुमार यादवचा मस्तीचा मूड कमी होताना दिसत नाहीये. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याने बॅकग्राऊंडला बॉलिवूड सिनेमा ‘वेलकम’मधील ‘मेरी एक टांग नकली है…’, असा एक प्रसिद्ध डायलॉग लावला आहे, ज्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दुखापती कधीही मजेशीर नसतात, पण मी हे गांभीर्याने घेईल आणि काही वेळात पूर्णपणे फिट होऊन परत येण्याचे वचन देतो. तोपर्यंत, मी आशा करतो की, तुम्ही सर्व सुट्ट्यांच्या या हंगामाचा आनंद घेत असाल आणि प्रत्येक दिवशी छोटा-छोटा आनंद घेत असाल.”

टी20त सूर्याच्या नेतृत्वाची कमाल
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत निराशाजनक प्रदर्शन करूनही संघाच्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याला टी20 संघाचा कर्णधार बनवले गेले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाला वाईटरीत्या पराभूत केले. ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही सूर्यकुमार टी20 संघाचा कर्णधार होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 टी20 सामन्यांची मालिका 1-1ने बरोबरीत सुटली होती. मात्र, यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. विशेष म्हणजे, सूर्याने नेतृत्वाशिवाय फलंदाजीतही कमाल केली होती. (cricketer suryakumar yadav shared video of his injured leg seen walking on crutches)

हेही वाचा-
‘वाद केवळ मैदानात…’, नवीनसाठी विराटशी भिडणाऱ्या गंभीरचे चोख उत्तर, व्हिडिओ व्हायरल
MS Dhoni । आयपीएलसाठी थालाच्या तयारीला सुरुवात, निवृत्तीबाबत सीएसके सीईओ म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---