क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश वनडे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल याने गुरुवारी (दि. 06 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, आता त्याच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. तमिमने 24 तासांच्या आत आपल्या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतल्यानंतर तमिमने निवृत्ती मागे घेतली. (Cricketer Tamim Iqbal Withdraws Retirement After Intervention from Bangladesh Prime Minister Sheikh Hasina read here)
काय म्हणाला होता तमिम?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत तमिम इक्बाल (Tamim Iqbal) माध्यमांपुढे म्हणाला होता की, “काल अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेला सामना माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा सामना होता. मी यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. अगदी तात्काळ घेतलेला निर्णय नाही. मी या गोष्टीचा अनेक दिवसांपासून विचार करत होतो. थांबण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी खेळलो. त्यांना अभिमान वाटावा असाच मी खेळण्याचा प्रयत्न केला. मला माहित नाही त्यांना कितपत मी गौरवान्वित करू शकलो. मात्र, मी माझे सर्व प्रयत्न केले.”
विशेष म्हणजे, तमिमने निवृत्ती घेतल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लिटन दास याच्याकडे वनडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. मात्र, आता निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर तमिम पुन्हा बांगलादेशचा कर्णधार बनतो की, नाही हे येणारा काळच सांगेल.
https://www.instagram.com/p/CuZXQG2JBM_/
तमिमची कारकीर्द
तमिम हा सध्या 34 वर्षांचा असून त्याने 2007 साली बांगलादेश संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. विशेष म्हणजे, 2007 वनडे विश्वचषकात भारताला पराभूत करणाऱ्या बांगलादेश संघाच्या विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता. तमिमने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत बांगलादेश संघाकडून 70 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 38.89च्या सरासरीने 5134 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 241 वनडे सामने खेळताना त्याने 36.62च्या सरासरीने 8313 धावा केल्या. याव्यतिरिक्त 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 24.08च्या सरासरीने 1758 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, टी20 क्रिकेटमधून मागील वर्षी निवृत्त झालेला तमिम सध्या वनडे संघाचे नेतृत्व भूषवत होता.
महत्वाच्या बातम्या-
बॉल फेकतोय की भाला! तिसऱ्या Ashes कसोटीत मार्क वूडने केला रेकॉर्ड, माजी कर्णधारही झाला फिदा
तिसऱ्या कसोटीत घाबरला बेअरस्टो! क्रीझमध्येच थांबल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूही लागले हसू, Video