भारतीय संघाला वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 4 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे या मालिकेत भारत 0-1ने पिछाडीवर पडला. असे असले, तरीही पदार्पणवीर तिलक वर्मा या सामन्यात चमकला. त्याने विस्फोटक फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानावर पाऊल ठेवताच तिलकने सुरुवातीच्या 3 चेंडूत 2 गगनचुंबी षटकार खेचले. तसेच, 22 चेंडूत 39 धावांची शानदार खेळी साकारली.
पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघ जरी पराभूत झाला असला, तरीही या सामन्यात तिलक वर्मा (Tilak Varma) याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. नुकताच बीसीसीआयने ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ईशान किशन (Ishan Kishan) तिलकची मुलाखत घेत आहे. ईशान यादरम्यान तिलकला त्याच्या पदार्पण आणि संघात संधी मिळाल्याच्या अनुभवाविषयी विचारताना दिसत आहे.
तिलक वर्माच्या पदार्पणावर रडले होते कुटुंबीय
खरं तर, ईशानने तिलकला प्रश्न विचारला की, भारताच्या टी20 संघात त्याची निवड झाल्यानंतर कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती आणि तुला कसे वाटत होते? यावर तिलक म्हणाला की, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची रात्री उशिरा घोषणा झाली आणि त्यावेळी तो दुलीप ट्रॉफी खेळत होता.
त्याने सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांना फोन केला. पदार्पणाबाबत फोनवर ऐकताच तिलक वर्माचे आई-वडील रडू लागले. पुढे तिलकने सांगितले की, “मला त्यांच्यासोबत जास्त बोलावे वाटत होते. मात्र, रात्रीच्या 11 वाजल्या होत्या, त्यामुळे मी कुटुंबीयांशी आणखी बोलत राहिलो असतो, तर ते आणखी रडले असते. त्यामुळे मी फोन कट केला.” यादरम्यान ईशानने म्हटले की, त्याच्या पदार्पणावेळीही कुटुंबीयांची हीच स्थिती होती.
Emotions after maiden call-up 🤗
Giving 💯 percent with the bat 💪
Favourite song 🤔We caught up with #TeamIndia Debutant @TilakV9 before the start of the #WIvIND T20I series 👌👌
WATCH his full conversation with @ishankishan51 🎥🔽 – By @ameyatilak https://t.co/vqZG1Kabwx pic.twitter.com/5a405KR3kP
— BCCI (@BCCI) August 6, 2023
ईशानने तिलकला पुढे विचारले की, आयपीएलमध्ये तू शानदार प्रदर्शन केले आणि तुला वाटले असे की, आता तुझी भारतीय संघातील निवड पक्की आहे? यावर तिलक म्हणाला की, “पहिला हंगाम वाटते की, पहिल्यांदा आयपीएल आणि शानदार प्रदर्शन करण्यासाठी मेहनत केली. असा विचार केला नव्हता की, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळायचे आहे. मात्र, भारताकडून खेळण्याचे स्वप्न तर प्रत्येकाचे असते.”
‘पदार्पणानंतर बदलला आहेस तू’- ईशान
यानंतर ईशानने तिलकला विचारले की, तू अचानक इतका कसा बदलला आहेस? तुझ्या पूर्ण हातावर, छातीवर, पायावर प्रत्येक ठिकाणी टॅटू आहे. जनतेला उत्तर हवंय? यावर तिलक म्हणाला की, “हे आधीपासूनच होते. अचानक झाले नाहीये. मला लहानपणापासून टॅटू काढायचा होता. मी कोचला विचारले, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. ते या गोष्टींसाठी कधीच परवानगी देत नव्हते. ते म्हणाले होते की, जेव्हा एका चांगल्या स्तरावर पोहोचशील, तेव्हा हे सर्व कर.”
पुढील सामना केव्हा?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 06 ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. (cricketer tilak varma parents emotional after maiden call up team india see video)
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आशिया चषक 2023 स्पर्धेतील 13 सामन्यांच्या वेळा निश्चित, वाचा किती वाजता खेळले जाणार सामने
पॅट कमिन्सबाबत धक्कादायक बातमी! विश्वचषकापूर्वी कांगारुंचं टेन्शन वाढलं, लगेच वाचा