ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात शुक्रवारी (दि. 8 ऑक्टोबर) 2 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 31 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज टीम डेविड याने 42 धावांची अफलातून खेळी केली. यावेळी त्याने आपल्या डावादरम्यान असा काही षटकार खेचला, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे.
आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टीम डेविड (Tim David) वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर तुटून पडला. 17वे षटक टाकण्यासाठी आलेल्या ओबेद मॅकॉय (Obed McCoy) याच्यावर डेविड चांगलाच बरसला. डेविडने त्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर सलग 2 षटकार खेचले. यामधील तिसऱ्या चेंडूवर डेविडने मारलेला षटकार हा तब्बल 110 मीटर लांबीचा होता. हा शॉट इतका जबरदस्त होता की, चेंडू थेट स्टेडिअमच्या वरच्या भागावर जाऊन पोहोचला.
Tim David with the one-two punch! The second six travelled 110m! 💥💥 #AUSvWI#PlayOfTheDay | #Dettol pic.twitter.com/2zPyMatSGj
— cricket.com.au (@cricketcomau) October 8, 2022
सामन्यादरम्यान समालोचकाने डेविडच्या शॉटची तुलना बेस बॉलच्या शॉटशी केली. डेविड याने 17व्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 20 धावा चोपल्या. मात्र, मॅकॉयनेही पाचव्या चेंडूवर डेविडला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. डेविड जेव्हा बाद झाला, तेव्हा त्याने 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा चोपल्या होत्या. आपल्या खेळीदरम्यान डेविडने पाचव्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथसोबत 56 धावांची खेळी केली.
https://twitter.com/SportyVishal/status/1578328222210457600?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1578328222210457600%7Ctwgr%5E290c67e97d12110427bc3daeeedda366b9e84a13%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fwatch-video-tim-david-massive-110-meter-six-in-aus-vs-wi-2nd-t20-match-1046187
मालिका ऑस्ट्रेलियाच्या नावावर
ब्रिस्बेन येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 178 धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर याने 41 चेंडूत 75 धावांची खेळी केली होती. वॉर्नरने या धावा करताना 10 चौकार आणि 3 षटकार चोपले होते. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 8 विकेट्स गमावत फक्त 147 धावाच करता आल्या. यापूर्वी झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! क्रिकेटनंतर ‘या’ खेळात नशीब आजमावणार सचिन आणि धोनी? लेटेस्ट फोटो व्हायरल
नाद करायचा नाय! पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला बांगलादेशकडून घेतला, टीम इंडिया पुन्हा टेबल टॉपर