Urvil Patel Record: गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी 8 खेळाडूंना रिलीज केले आहे. तसेच, हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्स संघाने ट्रेडमार्फत आपल्या ताफ्यात सामील केले आहे. अशातच विजय हजारे ट्रॉफी 2023 स्पर्धेत एका युवा खेळाडूने विस्फोटक खेळी केली. या खेळाडूला अलीकडेच गुजरात टायटन्सने रिलीज केले आहे. कदाचित आता त्यांना याचा पश्चाताप होत असावा.
गुजरात संघातून बाहेर पडलेल्या खेळाडूचा धमाका
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने रिलीज केलेल्या खेळाडूचे नाव उर्विल पटेल (Urvil Patel) आहे. उर्विलने रिलीजच्या एक दिवसानंतर विजय हजारे ट्रॉफी 2023 (Vijay Hazare Trophy 2023) स्पर्धेत ऐतिहासिक खेळी केली. त्याने चंडीगडमध्ये गुजरातकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध 41 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. उर्विल पटेल वेगवान शतक (Urvil Patel Fastest Century) करणारा दुसरा भारतीय ठरला. उर्विलचे हे शतक अ दर्जाच्या क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेले दुसरे वेगवान शतक ठरले.
Just 1 day after getting released by Gujarat Titans.
Urvil patel smashed 41 ball HUNDRED 💯There are not many more attacking Indian openers than Urvil + his keeping.
Agar RCB ne Anuj ko release kiya hota to 100% iske pichhe jati. Abhi don't know#IPL2024 #IPLAuction pic.twitter.com/x0YqQ4uzew
— Varun Giri (@Varungiri0) November 27, 2023
यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नावावर होता. त्याने 42 चेंडूत हा कारनामा केला होता. मात्र, उर्विलने सूर्याला मागे टाकले. या यादीत अव्वलस्थानी युसूफ पठाण आहे. त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 40 चेंडूत शतक केले होते.
गुजरात टायटन्सने दिली नाही संधी
गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 लिलावावेळी उर्विलला 20 लाख रुपयात संघात घेतले होते. उर्विल यष्टीरक्षक फलंदाज आहे. मात्र, गुजरातमध्ये वृद्धिमान साहा, केएस भरत आणि मॅथ्यू वेड यांसारखे यष्टीरक्षक असल्यामुळे आयपीएल 2023मध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 2017-18 हंगामात पदार्पण करणाऱ्या उर्विलने 10 अ दर्जाचे सामने खेळताना 29.14च्या सरासरीने आणि 112.08च्या स्ट्राईक रेटने 204 धावा केल्या आहेत. त्याने 41 टी20 सामनेही खेळले आहेत. त्यात त्याने 21.17 च्या सरासरीने आणि 155.41च्या स्ट्राईक रेटने 847 धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्सने रिटेन आणि रिलीज केलेले खेळाडू
रिटेन खेळाडू– डेविड मिलर, शुबमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विलियमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, राशिद खान, जोश लिटिल, मोहित शर्मा
रिलीज खेळाडू- यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्जारी जोसेफ, दसून शनाका (cricketer urvil patel smashes records second fastest list a ton by indian)
हेही वाचा-
IPL 2024: मुंबईकडून 17.50 कोटींना घेतलेल्या ग्रीनला RCBकडून खास रोल, संघाच्या संचालकाने दिली माहिती
INDvsAUS 3rd T20: निसर्गाने नटलेल्या गुवाहाटीत बलाढ्य संघ भिडणार, पीचमधून कुणाला मिळणार फायदा? वाचा