भारतीय संघाचा मुख्य फलंदाज वेंकटेश अय्यर याने संघातून स्वत:ला बाहेर करण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. वेंकटेशला भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून सामील केले होते, पण हार्दिक पंड्या याचे पुनरागमन होताच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला. वेंकटेशनुसार, जर भारतीय संघात त्याला जागा कायम ठेवायची असेल, तर हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू बनावे लागेल.
वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याने आयपीएल (IPL) स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत भारतीय संघात जागा मिळवली होती. मात्र, तो अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे वेंकटेशला संघातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याने संघाबाहेर काढण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मी माझ्या गोलंदाजीवर सातत्याने काम करतोय’
माध्यमांशी बोलताना त्याला विचारण्यात आले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला संघात घेऊन तुला बाहेर काढले गेले. त्यावेळी तुझी भावना काय होती? या प्रश्नाचे उत्तर देताना वेंकटेश म्हणाला की, “भारतात खूप जास्त समस्या आहेत. जर तुम्ही हार्दिक पंड्याला पाहिलं, तर तो भारताचा टॉप अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडे त्याप्रकारचे कौशल्य आहे. जर मला संघात जागा मिळवायची असेल, तर त्याच्यासारखे शानदार अष्टपैलू बनावे लागेल. मी सध्या त्याच्या आसपासही नाहीये.”
तो पुढे म्हणाला की, “मला हे मान्य करावेच लागेल, पण मी यावर काम करत आहे. एकदा मला माझ्या गोलंदाजीवर विश्वास बसला, तर मी पुन्हा प्रत्येक विभागात योगदान देऊ शकतो. मी आपल्या गोलंदाजीवर यावेळी खूप काम करत आहे.”
वेंकटेश अय्यर याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा भाग आहे. त्याने केकेआर (KKR) संघाकडून शानदार कामगिरी केली आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातही त्याने शानदार प्रदर्शन केले होते. त्याने आयपीएल 2023 हंगामात 14 सामने खेळताना 28.86च्या सरासरीने 404 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतकेही झळकावली होती. (cricketer venkatesh iyer reacts on being dropped from indian team)
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय
अमेलिया-सोफीच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा दमदार विजय, श्रीलंकेला 111 धावांनी पत्करावी लागली हार