सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल 2023चा 65वा सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह आरसीबी संघ प्ले-ऑफच्या आणखी जवळ पोहोचला. या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली याने खणखणीत शतक झळकावे. त्याने 63 चेंडूत 100 धावा केल्या. हे त्याचे आयपीएलमधील सहावे शतक आहे. यासोबतच तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल याच्यासोबत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी विराजमानदेखील झाला. शतकानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिनेदेखील सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले.
विराट कोहली (Virat Kohli) याच्या डावादरम्यान त्याचे चाहतेही खुश झाले. आता चाहतेच इतके खुश झालेत, तर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Virat Kohli Wife Anushka Sharma) ही किती खुश झाली असेल, याचा अंदाज लावणे कठीण नाही. कारण, विराटने आयपीएलमध्ये 4 वर्षांनंतर शतक झळकावले आहे. यावेळी अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरी (Anushka Sharma Instagram Story) शेअर करत विराटसाठी खास गोष्ट लिहिली.
अनुष्काची इंस्टाग्राम स्टोरी
अनुष्काने तिच्या भावना मांडण्यासाठी काही इमोजींचाही आधार घेतला. तिने स्टोरी शेअर करत लिहिले की, “तो फायर आहे. काय कमालीची खेळी आहे.” यासोबत तिने फटाके आणि लव्ह इमोजीचाही वापर केला.
आरसीबी (RCB) संघासाठी हैदराबादविरुद्धचा हा सामना जिंकणे खूपच गरजेचे होते. 187 धावांचे आव्हान सोपे नव्हते. चेंडू खेळपट्टीवर थांबत येत होता. मात्र, विराट हा जबरदस्त खेळाडू आहे. तो अनेकदा अशा प्रत्येक सामन्यात मजबूतीने पुढे येतो आणि हैदराबादविरुद्धही असेच घडले. विराटने कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी रचली. यानंतर आरसीबीला विजय मिळवणे सोपे झाले. विराटने षटकार मारत शतक पूर्ण केले. फाफनेही 47 चेंडूत 71 धावांची वादळी खेळी केली. त्यासोबतच आरसीबीने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. या विजयासह आरसीबी गुणतालिकेत 13 सामन्यात 14 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान झाला. (cricketer virat kohli century against sunrisers hyderabad anushka sharma reaction rcb vs srh ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जबरदस्त योगायोग! 18 नंबरची जर्सी घालून विराटने 18 मे रोजी ठोकली 2 IPL शतके, हातावर लागलेले 9 टाके
विक्रमी शतकानंतर भरभरून बोलला विराट, हैदराबादच्या प्रेक्षकांचे ‘या’ गोष्टीसाठी मानले आभार