---Advertisement---

अनुष्कासाठी चुकीचा शब्द वापरणाऱ्या पॅपराजीला विराटचे मजेशीर उत्तर, व्हिडिओ तुफान व्हायरल

On: गुरूवार, मे 11, 2023 3:22 PM
Virat Kohli Anushka Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णदार विराट सध्य फक्त फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये खेळत आहे. चालू आयपीएल हंगामात आरसीबीने आतापर्यंत 11 पैक पाच सामने जिंकले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हंगामातील राहिलेल्या तीन पैकी तिन्ही सामने आरसीबीला जिंकावे लागणार आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला पुढचा सामना खेळण्याआधी विराट कोहलीने आपल्या रेस्टॉरंटमध्ये आरसीबीसाठी मेजवानी आयोजित केली होती. यावेळी विराटचा एक मजेशीर अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला.

आरसीबीला मागच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. अशात प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला पुढचे तिन्ही सामने जिंकवे लागणार आहेत. आपला पुढचा सामना आरसीबीला रविवारी (14 मे) राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचा आहे. मागच्या सामन्यात मुंबईकडून पराभव स्वाकरल्यानंतर विराटने आरसीबीच्या सर्व खेळाडूंना आपल्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी दिली. यावेळी विराटचा एक वेगळाच अंदाच पाहायला मिळाला. रेस्टॉरंटबाहेर उपस्थित असलेल्या पॅवराजीकडून यायवेळी एक चूक झाली, ज्यावर विराटने त्यांची फिरकी घेतली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराटचे हे रेस्टॉरंट जुहूमध्ये आहे. यावेळी विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती. दोघांनी पॅपराजीसोबत फोटोसाठी अनेक पोज दिल्या. यावेळी पॅपराजीपैकीच कोणा एकाने अनुष्का शर्माला ‘सर’ म्हटले. हे ऐकल्यानंतर क्षणाचा विलंब न करता उत्तर दिले. विराट म्हणाला, “आता मलाही मॅम असे म्हणा.” विराटने दिलेले मजेशीर उत्तर चाहत्यांना चांगलेच आवडत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, विराटचे हे रेस्टॉरंट एकेकाळी किशोर कुमार यांचा बंगला होते. विराटने मागच्या वर्षी याठिकाणी रेस्टॉरंट सुरू केले. हा बंगला विराटने पाच वर्षांच्या करारवर भाड्याने घेतल्याचेही सांगितले गेले होते. चालू आयपीएल हंगामातील पहिल्या 11 सामन्यांमध्ये विराटचे प्रदर्शन पाहिले, तर ते समाधानकारक ठरले आहे. विराटने आतापर्यंत 42.00च्या सरासरीने 420 धावा केल्या आहेत. नाबाद 82 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. येत्या सामन्यांमध्येही विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. (Virat Kohli and Anushka Sharma’s funny video is going viral.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा कौतुकास्पद निर्णय! बोल्टची ‘ती’ इच्छा करणार पूर्ण
शिवम दुबे बनलाय नवी ‘सिक्स हिटिंग मशिन’! आयपीएल 2023 मधील आकडेवारी ‘एकदम झकास’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---