न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा सध्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करतोय. मागील दहा वर्षांपासून न्यूझीलंड संघाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या बोल्ट याने मागील वर्षी आपल्या बोर्डाची केंद्रीय करार करण्यास नकार दिला होता. केंद्रीय करार नसल्याने तो राष्ट्रीय संघासाठी खेळत नाही. मात्र, काही तासांपूर्वीच एका मुलाखतीत त्याने आपल्याला न्यूझीलंडसाठी विश्वचषक खेळायला आवडेल असे म्हटलेले. याबाबत चर्चा होत असतानाच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो विश्वचषक खेळू शकतो असे आश्वासन दिले आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या नव्या केंद्रीय करारातून आपल्याला वगळावे अशी मागणी ट्रेंट बोल्ट व जिमी निशाम यांनी केलेली. त्यानंतर त्यांना बाजूला केले गेले. असे असताना हे दोन्ही खेळाडू टी20 विश्वचषक खेळले होते. मात्र, त्यानंतर एकाही द्विपक्षीय मालिकेत या दोघांना संधी मिळाली नाही.
आयपीएल दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला पुन्हा एकदा देशासाठी विश्वचषक खेळायचा आहे असे बोल्टने म्हटलेले. त्यानंतर बोर्ड त्याला संधी देणार का अशी चर्चा सातत्याने सुरू झालेली. आता याच मुद्द्यावर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,
“बोल्टने इच्छा व्यक्त केली आहे की त्याला विश्वचषक खेळायचा आहे. आम्ही त्याला रोखणार नाही. न्यूझीलंड संघासाठी तो नक्कीच विश्वचषक खेळेल.”
बोल्ट हा मागील दोन विश्वचषक अंतिम फेरीत खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला होता. यावेळी केन विलियम्सन हा विश्वचषकात सहभागी होणार नसल्याने, टीम साऊदी व बोल्ट यांच्या अनुभवाचा व गोलंदाजीचा संघाला फायदा होईल.
(Newzealand Cricket Boards CEO Confirm Trent Boult Will Play For Newzealand In 2023 ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शिवम दुबे बनलाय नवी ‘सिक्स हिटिंग मशिन’! आयपीएल 2023 मधील आकडेवारी ‘एकदम झकास’
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सने रचला इतिहास! एकाच दिवशी तीन मेडल केले पक्के