सध्या भारतात आयपीएलचा थरार सुरू आहे. जगभरातील अनेक नामांकित क्रिकेटपटू या प्रतिष्ठेच्या लीगमध्ये खेळताना दिसत आहेत. असे असतानाच कझाकस्तान येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एकाच दिवशी तीन भारतीय बॉक्सर्सने उपांत्य फेरीत प्रवेश करत तीन पदके निश्चित केली. यापूर्वी कोणत्याही चॅम्पियनशिपमध्ये भारताला दोन पेक्षा अधिक पदके मिळाली नाहीत.
Historical outing for team ???????? at the #MWCHs ????????
???? on the ???? now ????????@AjaySingh_SG l @debojo_m#TeamIndia#MWCHs#WorldChampionships#PunchMeinHaiDum#Boxing @Deepakbhoria19 @Hussamboxer @nishantdevjr pic.twitter.com/xBqURFv8H6
— Boxing Federation (@BFI_official) May 10, 2023
ताश्कंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत गुरुवारी (10 मे) भारतीय बॉक्सर मोहम्मद हसमुद्दीन, निशांत देव व दीपक भोरिया यांनी आपापले सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासह भारताच्या खात्यात तीन पदके जमा झाली. यापूर्वी 2019 मध्ये अमित पंघल व मनीष कौशिक यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते.
भारतासाठी या स्पर्धेतील पहिले पदक दीपक याने पक्के केले. त्याने किर्गिस्थानच्या दियुशबाएव नुरजीगित याला 5-0 अशी मात दिली. दोन वेळा राष्ट्रकुल पदक मिळवलेला मोहम्मद हसमुद्दीन हा आपला बाऊट 4-3 असा जिंकण्यात यशस्वी ठरला. जागतिक स्पर्धेतील हे त्याचे पहिलेच पदक ठरले. त्याचबरोबर युवा निशांत देव याने क्युबाच्या खेळाडूला 5-0 अशी एकतर्फी मात देत पदक निश्चित केले. भारतीय बॉक्सर्सने यापूर्वी या स्पर्धेमध्ये केवळ सहा पदक पटकावली होती.
(Nishant Dipak And Hussauddin Confirm Medals For In World Boxing Championship 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्यांदा सामनावीर ठरवूनही जडेजाला आहे ही खंत, म्हणाला, “धोनीमुळे मला…”
स्वतःच्या फलंदाजीविषयी प्रथमच बोलला धोनी, म्हणाला, “मी सर्वांना सांगून ठेवलेय…”