बुधवारी (दि. 10 मे) आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीला 27 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे चेन्नई संघ प्ले ऑफ्सच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. त्याचवेळी या सामन्यात उतरताना चेन्नईचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू याने आयपीएल कारकिर्दीतील 200 सामने पूर्ण केले. ही कामगिरी करताना त्याच्या नावे आणखी एक विक्रम नोंदवला गेला.
अंबाती रायुडू याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दिल्ली विरुद्धचा सामना त्याचा 200 वा आयपीएल सामना होता. रायुडू हा आयपीएल इतिहासातील एकमेव असा क्रिकेटपटू आहे ज्याने एकही कसोटी सामना न खेळता 200 सामने पूर्ण केले. यापूर्वी कायरन पोलार्ड याने एकही कसोटी न खेळता 189 आयपीएल सामने खेळले होते.
आपल्या या महत्त्वाच्या सामन्यात खेळताना रायुडूने प्रत्येकी एक चौकार व षटकार खेळत 17 चेंडूवर 21 धावा केल्या.
या सामन्याचा विचार केल्यास, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाजांच्या थोड्या थोड्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 168 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातच खराब झाली. त्यांनी आपले पहिले तीन गडी स्वस्तात गमावले. रायली रुसो व अक्षर पटेल यांनी थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना विजयीरेषा पार करण्यात त्यांना अपयश आले. या पराभवामुळे आता दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
एकही कसोटी न खेळता सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारे खेळाडू
अंबाती रायुडू 200
कायरन पोलार्ड 189
युसुफ पठाण 174
मनिष पांडे 168
संजू सॅमसन 149
(Ambati Rayudu Played His 200 IPL Match Without Playing Test Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्यांदा सामनावीर ठरवूनही जडेजाला आहे ही खंत, म्हणाला, “धोनीमुळे मला…”
स्वतःच्या फलंदाजीविषयी प्रथमच बोलला धोनी, म्हणाला, “मी सर्वांना सांगून ठेवलेय…”






