---Advertisement---

तिसऱ्यांदा सामनावीर ठरवूनही जडेजाला आहे ही खंत, म्हणाला, “धोनीमुळे मला…”

On: गुरूवार, मे 11, 2023 8:00 AM
---Advertisement---

आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव केला. या विजयामुळे चेन्नई प्ले ऑफ्सच्या जवळ पोहचला आहे. या सामन्यात शानदार गोलंदाजी करणारा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला. सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर मात्र त्याने एक खंत व्यक्त केली.

फलंदाजांनी उभारलेल्या 168 धावांचा बचाव करताना चेन्नईसाठी सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या हंगामात आतापर्यंत आपल्या फिरकीने अनेकांना तंबूचा रस्ता दाखवलेल्या जडेजाने या सामन्यात देखील आपला तो फॉर्म कायम राखला. त्याने चार षटकांमध्ये केवळ 19 धावा देताना एक बळी मिळवला. तत्पूर्वी, फलंदाजी करताना त्याने एक चौकार व एक षटकार खेचत 21 धावा केल्या होत्या.

सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर जडेजा बोलताना म्हणाला,

“इथे गोलंदाजी करून आनंद येतो. एक संघ म्हणून उत्कृष्ट कामगिरी करण्यात आम्ही यशस्वी ठरत आहे. फलंदाजीवेळी मात्र ज्यावेळी मी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, त्यावेळी लोक माही भाईच्या नावाचा जयघोष करत असतात. मी आणखी वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली तर, लोक माझ्या बाद होण्याची वाट पाहतील. मात्र, संघ म्हणून आम्ही एक आहोत याचा आनंद आहे.”

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाजांच्या थोड्या थोड्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 168 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे पहिले तीन गडी लवकर परतले. रायली रुसो व अक्षर पटेल यांनी थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. या पराभवामुळे आता दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच, चेन्नई प्ले ऑफ्सच्या जवळ पोहोचली.

(Ravindra Jadeja Talk About Regrets While He Batting For CSK In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : वडील धोनीने षटकार मारताच झिवाने वाजवली शिट्टी, तर पत्नी साक्षीनेही केला आनंद साजरा
नाद करायचा नाय! चाहर 2018पासून गाजवतोय आयपीएलचा पॉवरप्ले, बोल्ट अन् शमीलाही पछाडत रचला विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---