बुधवारी (दि. 10 मे) चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवरील आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खास ठरला. महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील सीएसकेने या सामन्यात दिल्लीला 27 धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा सामना जिंकताच चेन्नईने गुणतालिकेतील स्थान आणखी बळकट केले. चेन्नईच्या या प्रवासात अष्टपैलू शिवम दुबे याचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. आपल्या आक्रमक फटकेबाजीने त्याने संपूर्ण हंगाम गाजवल्याचे दिसून येते.
शिवम दुबे हा मागील हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. आक्रमक फटकेबाजी तसेच मध्यमगती गोलंदाजासाठी ओळखला जाणारा दुबे यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळला होता. मात्र, त्यावेळी त्याला एखाद दोन सामन्या व्यतिरिक्त फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. मात्र, चेन्नईसाठी तो सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे.
आयपीएल 2023 मध्ये त्याने फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक 16 षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 14 षटकारांसह संजू सॅमसन येतो. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याने 13 षटकार फिरकीपटूंविरुद्ध खेचले आहेत.
दुबे या हंगामात सरासरी 18.5 चेंडू खेळून बाद झाला आहे. त्याचवेळी त्याने प्रत्येक 11 चेंडूंनंतर षटकार खेचलेला आकडेवारीनुसार दिसून येते. याचाच अर्थ त्याने प्रत्येक सामन्यात एक तरी षटकार खेचला आहे. दुबे याच्या आयपीएल 2023 मधील कामगिरीचा विचार केल्यास त्याने 11 सामन्यात तीन अर्धशतकांच्या मदतीने 315 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 35 तर स्ट्राईक रेट 159 इतका प्रभावी राहिला आहे. यामध्ये तब्बल 27 षटकारांचा समावेश असून, सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
(Chennai Super Kings Batter Shivam Dube Six Hitting Stats In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्यांदा सामनावीर ठरवूनही जडेजाला आहे ही खंत, म्हणाला, “धोनीमुळे मला…”
स्वतःच्या फलंदाजीविषयी प्रथमच बोलला धोनी, म्हणाला, “मी सर्वांना सांगून ठेवलेय…”