---Advertisement---

सामना संपताच दुडूदुडू धावत झिवाने धोनीला मारली मिठी! पाहा क्युट व्हायरल व्हिडिओ

On: गुरूवार, मे 11, 2023 11:54 AM
---Advertisement---

बुधवारी (दि. 10 मे) आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीला 27 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे चेन्नई प्ले ऑफ्सच्या जवळ पोहचला आहे. असे असतानाच या सामन्यासाठी हजेरी लावलेली चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याची मुलगी झिवा ही सामना संपल्यानंतर आपल्या वडिलांना जाऊन बिलगली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात धोनीने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 8 चेंडू खेळले. यामध्ये एक चौकार व दोन षटकारांच्या मदतीने त्याने 20 धावा केल्या. तो फटकेबाजी करत असताना त्याची मुलगी झिवा ही टाळ्या वाजवताना दिसून आली होती. त्यानंतर सामना संपल्यावर ती धावत आपल्या वडिलांकडे गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

 

या व्हिडिओमध्ये धोनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना, झिवा धावत त्याच्याकडे जाते व त्याला मिठी मारते. एका चाहतीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाजांच्या थोड्या थोड्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 168 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे पहिले तीन गडी लवकर परतले. मधल्या फळीत रायली रुसो व अक्षर पटेल यांनी वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. या पराभवामुळे आता दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तसेच, चेन्नई प्ले ऑफ्ससाठी पात्र होण्यापासून केवळ एक अंक दूर आहे.

(MS Dhoni Daughter Ziva Hug Him After Match Against Delhi Capitals Video Goes Viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शिवम दुबे बनलाय नवी ‘सिक्स हिटिंग मशिन’! आयपीएल 2023 मधील आकडेवारी ‘एकदम झकास’
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सने रचला इतिहास! एकाच दिवशी तीन मेडल केले पक्के 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---