---Advertisement---

टीकाकारांना विराटचे सडेतोड प्रत्युत्तर; सांगूनच टाकले, कुणाशी आहे त्याची लढाई

On: बुधवार, मे 10, 2023 8:56 PM
Virat-Kohli-And-Rohit-Sharma
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ संमिश्र कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 15 हंगामात आरसीबीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण आहे. मात्र, या हंगामातही संघाने ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, त्यांच्या संघाला खास प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे आरसीबीच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात येताना दिसत आहेत. आयपीएल 2023च्या 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाल्यानंतर विराट कोहली याने लक्षवेधी पोस्ट शेअर केली, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

झाले असे की, 54व्या सामन्यात आरसीबीने 199 धावा केल्या होत्या. मुंबईने 200 धावांचे मिळालेले आव्हान 16.3 षटकात पार केले. यामध्ये सूर्यकुमार यादव याच्या सर्वाधिक 83 धावांचा समावेश होता. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 12 गुणांसह तिसरे स्थान पटकावले, तर आरसीबी संघ 10 गुणांसह सातव्या स्थानी घसरला. त्यामुळे त्यांचे प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची वाट खडतर झाली आहे.

विराट कोहलीची इंस्टाग्राम पोस्ट
मुंबईच्या हातून पराभव झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) जोरदार ट्रोल झाला. कारण, तो फक्त 1 धाव करून तंबूत परतला. यापूर्वीही माजी खेळाडूंनी स्ट्राईक रेटमुळे विराटला जोरदार ट्रोल केले होते. यानंतर आता विराटने टीकाकारांना खास अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे.

विराटने ट्विटरवर एक फोटो शेअर करत शानदार कॅप्शन दिले. त्याने ट्वीट केले की, “स्पर्धा फक्त तुमच्या डोक्यात असते. वास्तवात तुमचा सामना स्वत:शी असतो.” या फोटोत विराट एका खुर्चीवर बसला आहे आणि उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडताना दिसत आहे. त्याच्या या ट्वीटकडे टीकाकारांना दिलेले प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे.

https://twitter.com/imVkohli/status/1656182023403474951?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656182023403474951%7Ctwgr%5E65e53e11b076c970926464b26da50ad5f766c339%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fipl-2023-virat-kohli-tweet-reply-to-the-critics-latest-instagram-post-1089997

विराटच्या ट्वीटवर चाहत्यांनीही जोरदार कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी विराटला पाठिंबा दिला आहे, तर काही जण आरसीबीच्या पराभवासाठी विराटला जबाबदार ठरवत आहेत. (cricketer virat kohli tweet reply to the critics latest instagram post ipl 2023 )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेच्या ‘या’ खेळाडूचा दिल्लीविरुद्ध भीमपराक्रम! बनला 200वा IPL सामना खेळणारा फक्त 9वा खेळाडू
घरच्या मैदानात धोनीच ‘टॉस का बॉस’, दिल्लीविरुद्ध करणार पहिली बॅटिंग; ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---