---Advertisement---

सीएसकेच्या ‘या’ खेळाडूचा दिल्लीविरुद्ध भीमपराक्रम! बनला 200वा IPL सामना खेळणारा फक्त 9वा खेळाडू

On: बुधवार, मे 10, 2023 8:14 PM
Chennai-Super-Kings
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023चा 55वा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायुडू याच्यासाठी खूपच खास आहे. बुधवारी (दि. 10 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आहेत. या सामन्यात रायुडूच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. रायुडू अशी कामगिरी करणारा आयपीएलमधील 9वा खेळाडू ठरला आहे. चला तर त्याच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर महेंद्र सिंग धोनी याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीवेळी धोनीने संघातील एका बदलाविषयी सांगितले. धोनीने पथीशा पथिरानाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढत त्याच्या जागी अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याला ताफ्यात घेतले. त्यामुळे रायुडूच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1656313671595982848

अंबाती रायुडूचा विक्रम
आयपीएलमधील हा अंबाती रायुडूचा 200वा सामना (Ambati Rayudu 200th IPL Match) आहे. त्यामुळे तो 200वा सामना खेळणारा आयपीएलमधील 9वा खेळाडू ठरला. तसं पाहिलं, तर रायुडू याने आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्स आणि दुसरं म्हणजे मुंबई इंडियन्स. रायुडूने आतापर्यंत चेन्नईकडून फक्त 85 सामने खेळले आहेत, तर मुंबईकडून 114 सामने खेळले होते. आता दिल्लीविरुद्ध रायुडू चेन्नईसाठी 86वा सामना खेळत आहे.

त्याने चेन्नईकडून आतापर्यंत 30.63च्या सरासरीने 1 शतकासह 1869 धावा केल्या आहेत. तसेच, मुंबईकडून खेळताना त्याने 27.14च्या सरासरीने 2416 धावा केल्या होत्या. त्याने एकूण 199 सामन्यात 28.56च्या सरासरीने 4285 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतकाचा समावेश आहे.

https://twitter.com/IPL/status/1656314025704312848

आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारे खेळाडू
आयपीएलमध्ये 200हून अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी एमएस धोनी (MS Dhoni) आहे. धोनीने आतापर्यंत 246 सामने खेळले आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी दिनेश कार्तिक असून त्याने 240 सामने, तिसऱ्या स्थानावरील रोहित शर्मा याने 238 सामने, चौथ्या स्थानावरील विराट कोहली याने 234 सामने खेळले आहेत. तसेच, पाचव्या स्थानावरील रवींद्र जडेजा याने 222, सहाव्या स्थानावरील शिखर धवन याने 214, सातव्या स्थानावर संयुक्तरीत्या सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा असून त्यांनी प्रत्येकी 205 सामने खेळले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त नवव्या क्रमांकावर रायुडू असून तो 200वा सामना खेळत आहे. (big news Ambati Rayudu is playing his 200th match in IPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घरच्या मैदानात धोनीच ‘टॉस का बॉस’, दिल्लीविरुद्ध करणार पहिली बॅटिंग; ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर
‘बॅटिंग करताना त्याला रोखणे खूपच कठीण…’, विस्फोटक सूर्याची फलंदाजी पाहून भारतीय दिग्गजाने गायले गोडवे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---