इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने उभ ठाकले मोठ्या धावसंख्येच्या होऊनही एकतर्फी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. मुंबईच्या विजयाचा नायक सूर्यकुमार यादव हा ठरला. या सामन्यानंतर आरसीबीचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने त्याची गळाभेट घेत त्याचे कौतुक केले.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1656009780308381697?t=xYuRszgpX6KN7HleVzBxig&s=19
सूर्यकुमार यादव याने या सामन्यात फक्त 35 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 83 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 6 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला. त्याने मैदानाच्या चारही बाजूंना नेत्रदीपक फटकेबाजी करताना 200 धावांचे आव्हान अगदी छोटे सिद्ध केले. या त्याच्या खेळीनंतर तो मैदानतुन बाहेर जात असताना आरसीबीचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने त्याची गळाभेट घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सूर्याने हा सामना गाजवला असला तरी, दुसरीकडे विराट ला मात्र अपयश आले. मोठ्या अपेक्षा असताना तो सामन्यातील पहिल्याच षटकात 4 चेंडूवर 1 धाव काढत तंबूत परतला. यासोबतच वानखेडे स्टेडियमवरील त्याची खराब कामगिरी सुरूच राहिली.
या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला 6 विकेट्स गमावत 199 धावाच करता आल्या. हे आव्हान मुंबई संघाने 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत 200 धावा करून पार केले. यासोबतच 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
(Virat Kohli Hug Suryakumar Yadav After His Exceptional Knock Against RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेत चमकला मुंबईचा ‘सूर्य’, 83 धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर रचला ‘हा’ जबरदस्त विक्रम, वाचाच
आयपीएलमधील रोहितचा सर्वात वाईट काळ! मागच्या पाच इनिंग्ज विसरलेल्याच बऱ्या






