सध्या संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला आहे. शुक्रवारी (दि. 02 जून) ओडिसा राज्यातील बालासोर येथे सायंकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात दोनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. या घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या घटनेवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली रेल्वे अपघातामुळे दु:खी आहे. विराटने ट्वीट करत या घटनेवर शोक व्यक्त केले आहे.
विराट कोहली याचे ट्वीट
विराट कोहली (Virat Kohli) याने ट्वीट करत ओडिसा रेल्वे अपघात (Odisha Train Accident) प्रकरणावर भाष्य केले. विराटने ट्वीट करत लिहिले की, “ओडिसात वेदनादायी रेल्वे अपघाताबाबत ऐकून खूपच दु:ख झाले. माझी सहानुभूती त्या कुटुंबांसोबत आहे, ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. मी दुखापतग्रस्त व्यक्ती लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो.”
Saddened to hear about the tragic train accident in Odisha. My thoughts and prayers go out to the families who lost their loved ones and wishing a speedy recovery to the injured.
— Virat Kohli (@imVkohli) June 3, 2023
खरं तर, ओडिसाच्या बालासोर येथे तीन रेल्वेंची आपसात धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, 900हून अधिक लोक दुखापतग्रस्त झाल्याचे बोलले जात आहे. सातत्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी 7च्या आसपास झालेल्या या अपघातात कोरोमंडळ एक्सप्रेस रेल्वेचे अनेक डब्बे उद्ध्वस्त झाले आहेत.
या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी केली आहे. तसेच, गंभीर जखमी असलेल्या व्यक्तींना 2 लाख रुपये, तर किरकोळ जखमी असणाऱ्या व्यक्तींना 50 हजारांची मदत करण्यात येणार आहे.
Ex-gratia compensation to the victims of this unfortunate train accident in Odisha;
₹10 Lakh in case of death,
₹2 Lakh towards grievous and ₹50,000 for minor injuries.— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 2, 2023
डब्ल्यूटीसीसाठी लंडनमध्ये विराट
विशेष म्हणजे, विराट कोहली सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा (World Test Championship Final 2023) अंतिम सामना खेळण्यासाठी लंडनमध्ये आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळला जाणार आहे. हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान पार पडणार आहे. (cricketer virat kohli expressed grief over odisha train accident)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आमच्या देशात यायला प्रत्येक संघ घाबरतोय’, Asia Cupपूर्वी पाकिस्तानच्याच माजी खेळाडूचे खळबळजनक भाष्य
WTC Final : हर्षा भोगलेंनी निवडली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन, 8व्या स्थानासाठी ठेवले दोन पर्याय






