भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022च्या 35व्या सामन्यात बांगलादेश संघाला 5 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर बांगलादेशचा उपकर्णधार नुरूल हसन याने आरोप केला होता की, मैदानावरील पंचांनी विराट कोहली याच्या ‘फेक फिल्डिंग’ची घटना पाहिली नाही, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त 5 धावा मिळू शकल्या असत्या. यावर आता बांगलादेशचे तांत्रिक सल्लागार श्रीधरन श्रीराम यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
बांगलादेशचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट संघाचे तांत्रिक सल्लागार श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) यांनी शनिवारी (दि. 05 नोव्हेंबर) म्हटले की, टी20 विश्वचषकात भारताविरुद्धच्या पराभवासाठी फेक फिल्डिंगचे कारण सांगू इच्छित नाहीत.
यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) म्हटले होते की, ते हा मुद्दा पुढे उपस्थित करतील. मात्र, श्रीराम यांनी जोर देत म्हटले की, त्यांना या मुद्द्याला पराभवाचे कारण सांगायचे नाहीये. याखेरीज ते म्हणाले की, हा एक अटीतटीचा सामना होता आणि यामुळे पुढे जाऊन संघाला भरपूर आत्मविश्वास मिळेल.
ते म्हणाले की, “नाही, आम्हाला इथे कुठलेही निमित्त द्यायचे नाहीये. ही घटना घडल्यावर मी चौथ्या पंचांशी चर्चा केली, परंतु मला वाटते की, हा मैदानावरील पंचांचा निर्णय होता, आणि हेच आम्हालाही सांगायचे होते.”
“जर खेळाच्या सुरुवातीला कुणी म्हटले की, आम्ही भारताकडून पाच धावांनी पराभूत होऊ, तर मला वाटते, यावर कुणीही विश्वास ठेवला असता. त्यामुळे मला वाटते की, आम्ही स्वत:ला एका अशा टप्प्यावर होतो, जिथे आम्ही भारताला पराभूत करू शकत होतो, परंतु आम्ही विजय मिळवू शकलो नाही. मात्र, इतक्या जवळ आल्यानंतर मला वाटते की, खेळाडूंमध्ये खूप आत्मविश्वास आला आहे,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
यानंतर ते म्हणाले की, “माझ्या मते ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येकजण निराश होता की, त्यांना विजय मिळवता आला नाही. तसेच, त्यांना ही जाणीव झाली की, त्यांनी सुवर्णसंधी गमावली आहे. हा त्यांच्यासाठी खूप चांगला धडा आहे. मला वाटते, यामुळे संघाला खूप आत्मविश्वास मिळतो की, जर तुम्ही भारतासारख्या संघाला आव्हान देऊ शकता आणि इतक्या जवळ येऊ शकता, तर आम्ही विजयापासून दूर नाही.”
टी20 क्रिकेट प्रकारात रसेल डोमिंग यांच्या नेतृत्वात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बांगलादेश संघाने श्रीराम यांची निवड केली. आकडेवारी पाहिली, तर सध्याच्या विश्वचषकात त्यांनी शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स संघाला पराभूत केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बड्डे बाॅय विराट महिन्याला पितो ३६ हजार रुपयांचं पाणी…
भारताचा माजी कर्णधार विराट १८ नंबरची जर्सी का घालतो? कारण आहे खूपच भावूक