मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद 98 धावांची मॅच विनिंग खेळी करणारा राजस्थान रॉयल्स संघाचा युवा सलामीवीर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध फ्लॉप ठरला. रविवारी (दि. 14 मे) आयपीएल 2023च्या 60व्या सामन्यात यशस्वी जयसवाल 2 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. त्याला विराट कोहली याने झेलबाद करत तंबूचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, विराटने मागील सामन्यातील यशस्वीच्या वादळी खेळीसाठी त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले होते. तसेच, या सामन्यात जयसवालची विकेट घेऊन राजस्थानला सुरुवातीलाच धक्का दिला. हा सामना बेंगलोरने 112 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर विराट कोहली यशस्वी जयसवाल याला खास सल्ला देताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
सामन्यानंतर विराटने जयसवालला दिल्या टिप्स
खरं तर, राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याला मोहम्मद सिराज याने विराट कोहली (Virat Kohli) याच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर विराटने सामन्यातील अखेरचा झेलही घेत राजस्थानला 59 धावांवर रोखले. या पराभवानंतर राजस्थानच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना धक्का बसला. एवढंच नाही, तर या पराभवामुळे राजस्थान गुणतालिकेत सहाव्या स्थानी घसरला. तसेच, बेंगलोर संघ पाचव्या स्थानी पोहोचला.
या सामन्यानंतर विराट कोहली यशस्वी जयसवाल (Virat Kohli Yashasvi Jaiswal) याला टिप्स देताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर चाहते म्हणत आहेत की, विराट जयसवालला भारतीय संघात एन्ट्री करण्यासाठी गुरूमंत्र देत आहे.
As special as it gets 😃👌🏻
𝘼𝙣 𝙪𝙣𝙢𝙞𝙨𝙨𝙖𝙗𝙡𝙚 𝙞𝙣𝙩𝙚𝙧𝙖𝙘𝙩𝙞𝙤𝙣 ft. @imVkohli & @ybj_19 👏🏻👏🏻#TATAIPL | #RRvRCB | @RCBTweets | @rajasthanroyals pic.twitter.com/gkdyCB3hXf
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
यशस्वी जयसवालची आयपीएल 2023मधील कामगिरी
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जरी जयसवालला खास कामगिरी करता आली नसली, तरीही तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्याने आयपीएल 2023 स्पर्धेत आतापर्यंत 13 सामने खेळताना 1 शतक आणि 4 अर्धशतक ठोकले आहे. याच जोरावर त्याने आतापर्यंत 575 धावांचा पाऊस पाडला आहे. आता सामन्यात जयसवाल कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल. (cricketer virat kohli giving batting tips to yashasvi jaiswal after rcb beat rr by 112 runs video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
हा तर RCBचा धोनी! भावाने स्टंप्सकडे न पाहताच अश्विनला केले यष्टीचीत, ‘नो लूक’ Runout व्हिडिओ व्हायरल
‘कुठं चुकलो याचाच विचार…’, दारुण पराभवानंतर कॅप्टन संजूचे मोठे विधान