---Advertisement---

राजस्थानच्या बालेकिल्ल्यात बेंगलोरचा 112 धावांनी दणदणीत विजय, ‘रॉयल्स’चे आव्हान संपुष्टात

On: रविवार, मे 14, 2023 6:27 PM
Virat-Kohli
---Advertisement---

रविवारी (दि. 14 मे) डबल हेडरमधील (एका दिवशी दोन सामने) पहिला सामना राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअम येथे पार पडला. हा इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 58वा सामना सामना होता. या सामन्यात बेंगलोर संघाने 112 धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकत बेंगलोरने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावत प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. तसेच, राजस्थान संघ जवळपास प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला.

या सामन्यात आरसीबी (RCB) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरला. या सामन्यात बेंगलोरने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 171 धावांचा पाऊस पाडला. यावेळी आरसीबीच्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ 10.3 षटकात सर्व विकेट् गमावत 59 धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना बेंगलोरने 112 धावांनी जिंकला.

राजस्थान संघाची खराब खेळी
राजस्थान संघाने खराब सुरुवात केली. यावेळी त्यांच्या 5 विकेट्स हे पॉवरप्लेमध्येच पडल्या होत्या. एकूण 3 खेळाडू शून्यावर बाद झाले. त्यात यशस्वी जयसवाल, जोस बटलर आणि आर अश्विन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 4 फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. जो रूटही 10 धावा करून बाद झाला. एकट्या शिमरॉन हेटमायर याने 19 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार मारत सर्वाधिक 35 धावांचे योगदान दिले.

यावेळी आरसीबीकडून गोलंदाजी करताना वेन पार्नेल याने सर्वाधिक विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने यावेळी 3 षटके गोलंदाजी करताना फक्त 10 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली. (Royal Challengers Bangalore won by 112 runs against rajasthan royals)

बेंगलोरची 2 अर्धशतके
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 44 चेंडूंचा सामना करताना 55 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल यानेही 33 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने यावेळी 3 षटकार आणि 5 चौकार मारले. तसेच, अनुज रावत याने 11 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले, तर विराट कोहली याच्या 18 धावांचेही योगदान होते.

यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना ऍडम झम्पा आणि केएम आसिफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, संदीप शर्मा यानेही 1 विकेट नावावर केली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
ब्रेकिंग! राजस्थानच्या बालेकिल्ल्यात बेंगलोरचा 112 धावांनी दणदणीत विजय, ‘रॉयल्स’चे आव्हान संपुष्टात
याला म्हणतात कंसिस्टन्सी! IPL 2023मध्ये ‘अशी’ कामगिरी फक्त फाफलाच जमली, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---