शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. तसेच, मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली. या मालिकेतील पुढील सामना मंगळवारी (दि. 24 जानेवारी) मध्यप्रदेशच्या इंदोर येथील होळकर क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. भारतीय संंघाचा स्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्या वनडेत दुखापतग्रस्त झाला आहे. अशात तिसऱ्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधून त्याचा पत्ता कट होऊ शकतो. अशात विराटची जागा कोणता खेळाडू घेऊ शकतो, हे जाणून घेऊया.
विराट कोहलीच्या हाताला दुखापत
झाले असे की, भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. सामन्याच्या 24व्या षटकादरम्यान विराटच्या बोटांना दुखापत झाल्याची तक्रार समोर आली होती. खरं तर, विराट ग्लेन फिलिप्सच्या फटक्याला कव्हरमध्ये डाईव्ह मारून अडवण्याचा प्रयत्न करत होता. तो चेंडू रोखण्यासाठी विराटने लांब उडी मारली. यादरम्यान विराट चेंडू पकडण्यात अयशस्वी ठरला, पण त्याने स्वत:ला दुखापतग्रस्तही करून घेतले. विराटच्या बोटांना दुखापत झाल्याची माहिती आहे. मात्र, विराट काही वेळानंतर पुन्हा मैदानावर आला होता.
दुखापतग्रस्त झाल्यानंतर विराट लाईव्ह सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला होता. यादरम्यान फिजिओने त्याच्या हातावर पट्टीही बांधली होती. मात्र, दुखापतग्रस्त होऊनही तो मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी परतला होता. मात्र, ही घटना समोर आल्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. त्याची दुखापत गंभीर असेल, तर तो शेवटच्या वनडे सामन्यातून बाहेर होऊ शकतो. असे झाले, तर त्याच्या जागी अंतिम अकरामध्ये रजत पाटीदार (Rajat Patidar) याला संधी मिळू शकते. मात्र, विराटच्या दुखापतीविषयी अधिकृतरीत्या अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये.
मालिकेत विराटची बॅट शांत
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यात विराटला खास कामगिरी करता आली नाहीये. तो या मालिकेत फलंदाजीतून संघर्ष करताना दिसत आहे. विशेषत: फिरकी गोलंदाजाविरुद्ध तो संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. दोन्ही सामन्यात तो फिरकीपटू मिचेल सँटनर (Mitchell Santner) याच्या गोलंदाजीवर बाद झाला.
A great result. Indore next. ✌️🇮🇳 pic.twitter.com/ynDN9iQdit
— Virat Kohli (@imVkohli) January 21, 2023
पहिल्या सामन्यात विराट 4 धावांवर त्रिफळाचीत बाद झाला. तसेच, दुसऱ्या सामन्यातही तो सँटनरच्या चेंडूवर पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यष्टीमागे उभ्या असलेल्या टॉम लॅथम याने त्याला यष्टीचीत करत तंबूत धाडले. त्याने या सामन्यात फक्त 11 धावांची छोटी खेळी साकारली. आता तिसऱ्या वनडेत विराट खेळतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (cricketer virat kohli injured in second odi against new zealand rajat patidar can replace kohli in third odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान बोर्डाच्या माजी अध्यक्षांकडून गिलचं बारसं, रोहितवरून ठेवलं ‘हे’ नाव
याला म्हणतात जुडवा! स्वत:सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून सुनील नारायणही झाला हैराण, पाहा व्हिडिओ