---Advertisement---

पाकिस्तान बोर्डाच्या माजी अध्यक्षांकडून गिलचं बारसं, रोहितवरून ठेवलं ‘हे’ नाव

Shubman-Gill-And-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय खेळाडू सध्या जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्यामध्ये युवा विस्फोटक फलंदाज शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश होतो. गिलने श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडविरुद्धही दमदार प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले आहे. गिलच्या फलंदाजीचा प्रभाव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांच्यावरही झाला आहे. अशात रमीज राजा यांनी गिलविषयी मोठे भाष्य केले आहे. चला तर जाणून घेऊया ते गिलविषयी काय म्हणालेत…

शुबमन गिल (Shubman Gill) याच्याविषयी बोलतानाचा व्हिडिओ रमीज राजा (Ramiz Raja) यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला. यामध्ये त्यांनी गिलला मिनी रोहित शर्मा (Mini Rohit Sharma) म्हटले. तसेच, त्यांनी गिलच्या फलंदाजीचेही कौतुक केले. यासोबतच त्यांनी त्यांच्या पाकिस्तान संघालाही सल्ला दिला

रमीज राजांच्या मते गिल आहे मिनी रोहित शर्मा
खरं तर, भारतीय युवा फलंदाज शुबमन गिल मागील काही काळापासून शानदार कामगिरी करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या धमाकेदार खेळीनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही गिल चांगली कामगिरी करत आहे. त्याने न्यूझीलंड मालिकेच्या पहिल्या सामन्यात द्विशतकी आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 40 धावांची खेळी साकारली

याव्यतिरिक्त त्याने रोहित शर्मा याच्यासोबत भारताला चांगली सुरुवातही मिळवून दिला. त्याचे प्रदर्शन पाहून पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी गिलची प्रशंसा केली. त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “शुबमन गिल मिनी रोहित शर्माप्रमाणे दिसतो. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे. काळानुसार तो आक्रमक होत जाईल. त्याला काहीच बदल करण्याची गरज नाही. त्याने काही दिवसांपूर्वीच द्विशतक झळकावले आहे.”

रमीज राजांचा पाकिस्तानला सल्ला
रमीज राजा यांनी पुढे बोलताना म्हटले की, भारताला त्यांच्याच घरात हरवणे कठीण आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष पुढे बोलताना म्हणाले की, “भारताला भारतात हरवणे कठीण आहे. हे पाकिस्तानसह उपखंडातील इतर संघांसाठी शिकण्याची बाब आहे. पाकिस्तानकडे पुरेशी क्षमता आहे. मात्र, मालिका जिंकण्याच्या बाबतीत घरच्या मैदानावरील प्रदर्शन भारताप्रमाणे नाहीये. वनडे विश्वचषक 2023चे आयोजन भारतात होणार आहे. न्यूझीलंड एक वाईट संघ नाहीये. ते क्रमवारीतील अव्वल संघ आहे. न्यूझीलंड त्यांच्याच खेळात फसला आहे. कारण, त्यांच्या फलंदाजीत आत्मविश्वास आणि लय नव्हती.”

विशेष म्हणजे, विश्वचषक 2019नंतर भारतीय संघाने त्यांच्या घरात 19 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 15 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. भारताने वनडे मालिकेत खेळताना घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंडला मात दिली आहे. भारताचे हे प्रदर्शन पाहून रमीज राजांनी पाकिस्तानला वनडे विश्वचषक 2023 पूर्वीच हा सल्ला दिला आहे. (ind vs nz raipur odi ramiz raja praise on cricket shubman gill read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात जुडवा! स्वत:सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून सुनील नारायणही झाला हैराण, पाहा व्हिडिओ
भारत- न्यूझीलंडसाठी ‘करो वा मरो’ सामना, कोण कोणावर भारी? एका क्लिकवर घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---