Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत- न्यूझीलंडसाठी ‘करो वा मरो’ सामना, कोण कोणावर भारी? एका क्लिकवर घ्या जाणून

भारत- न्यूझीलंडसाठी 'करो वा मरो' सामना, कोण कोणावर भारी? एका क्लिकवर घ्या जाणून

January 22, 2023
in टॉप बातम्या, हॉकी
IND-vs-NZ-Hockey

Photo Courtesy: Twitter/TheHockeyIndia


भारतात सध्या हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील साखळी सामने आता संपले आहेत. तसेच, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी क्रॉस ओव्हर सामन्यांचा राऊंड सुरू होणार आहे. अशात रविवारी (दि. 22 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात हॉकी सामना खेळला जाणार आहे. या दोन्ही संघांसाठी हा ‘करो वा मरो’ सामना असणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड आमने-सामने आकडेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात खेळल्या जाणाऱ्या हॉकी सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसते. उभय संघात एकूण 104 सामने खेळले गेले आहेत. यामधील 58 सामन्यांवर भारताने आपले नाव कोरले आहे, तर 29 सामने जिंकण्यात न्यूझीलंड संघाला यश आले आहे. याव्यतिरिक्त 17 सामने अनिर्णित राहिले आहेत. शेवटच्या 5 सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर भारताने 4 सामन्यात विजय मिळवला आहे.

🇮🇳 IND VS NZL 🇳🇿

If you're happy and you know it, clap your hands!👏#IndiaKaGame #HockeyIndia #HWC2023 #StarsBecomeLegends #HockeyWorldCup #INDvsNZL @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/sPiiR9V9YI

— Hockey India (@TheHockeyIndia) January 22, 2023

हार्दिक सिंग दुखापतीमुळे बाहेर
या सामन्यापूर्वी हार्दिक सिंग दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तो एक शानदार डिफेंडर आहे. तसेच, संघासाठी त्याने अनेक गोल वाचवले आहेत. अशात न्यूझीलंडसारख्या संघाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त होणे संघासाठी खूपच खराब संकेत आहेत. हार्दिकला इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे वेल्सविरुद्धच्या सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. अशात संघात त्याच्या जागी चांगल्या खेळाडूची निवड करावी लागेल.

न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर बेल्जियमसोबत होईल सामना
हॉकि विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतीय संघाने दुसरा क्रमांक पटकावला होता. आता रविवारी भारताला न्यूझीलंडविरुद्ध क्रॉस ओव्हर (India vs New Zealand Crossover) सामना खेळायचा आहे.  भारताने हा सामना जिंकला, तर त्यांचा पुढील सामना डिफेंडिंग चॅम्पियन बेल्जियमसोबत होईल. बेल्जियम संघ खूपच मजबूत असल्याचे दिसत आहे. अशात भारताला चांगलीच तयारी करावी लागणार आहे.

हॉकी विश्वचषक 2023ची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामना पाहण्याचा आनंद स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेल्सवरून घेता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 एचडीवर सामना पाहू शकता.

मोबाईल आणि लॅपटॉपवर कसा पाहता येईल सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह पाहता येऊ शकतो. त्यासाठी डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपचा वापर करावा लागेल. (hockey world cup 2023 india vs new zealand crossover head to head matches and live streaming in india know here)

हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघ
पीआर श्रीजेश, कृष्णा पाठक, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग , ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजित सिंग, राजकुमार पाल आणि जुगराज सिंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फक्त हे काम कर, मग जगावर राज्य करशील’, अनुभवी शमीचा ‘वेगाच्या बादशाह’ला मोलाचा सल्ला
‘बेबी एबी’साठी मुंबई इंडियन्सचे ‘हे’ खेळाडू आहेत आदर्श; एक रोहित, तर दुसरा कोण?


Next Post
Shoaib Akhtar

'माझा बायोपिक बनवला तर केस ठोकेल...', शोएब अख्तरकडून निर्मात्यांना चेतावणी

Axar-Patel

केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे अष्टपैलूची होणारी पत्नी

Sunil-Narine

याला म्हणतात जुडवा! स्वत:सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून सुनील नारायणही झाला हैराण, पाहा व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143