• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

‘बेबी एबी’साठी मुंबई इंडियन्सचे ‘हे’ खेळाडू आहेत आदर्श; एक रोहित, तर दुसरा कोण?

'बेबी एबी'साठी मुंबई इंडियन्सचे 'हे' खेळाडू आहेत आदर्श; एक रोहित, तर दुसरा कोण?

Atul Waghmare by Atul Waghmare
जानेवारी 22, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Dewald-Brevis-And-Rohit-Sharma

Photo Courtesy: Twitter/mipaltan


दक्षिण आफ्रिकेत एसए20 लीगचा घाट घातला गेलाय. या स्पर्धेचा हा पहिलाच हंगाम आहे. या स्पर्धेतील संघांची मालकी ही आयपीएल फ्रँचायझींची आहे. 10 जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 17 सामने खेळले गेले आहेत. त्यातील 16वा सामना एमआय केप टाऊन विरुद्ध पार्ल रॉयल्स संघात पार पडला. हा सामना केप टाऊनने 13 धावांनी नावावर केला. या स्पर्धेत ‘बेबी एबी’ म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस एमआय केप टाऊन या संघाकडून खेळतोय. रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यात त्याला खास कामगिरी करता आली नाही. असे असले, तरीही त्याने या सामन्यापूर्वी केलेले भाष्य सर्वांचे लक्ष वेधत आहे.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघातील दोन सहकारी आपले आदर्श असल्याचे एमआय केप टाऊन (MI Cape Town) संघाचा प्रतिभावान फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याने सांगितले आहे. ते दोन खेळाडू इतर कुणी नसून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे आहेत. त्याने असेही म्हटले आहे की, तो त्यांच्याकडून खूप काही शिकला आहे.

काय म्हणाला ब्रेविस?
यादरम्यान बोलताना ब्रेविस म्हणाला की, “मला निळा रंग खूप आवडतो. त्यामुळे या कुटुंबाचा भाग होणे माझ्यासाठी अद्भूत आहे. मुंबईप्रमाणे केप टाऊनमध्येही सर्वकाही शानदार आहे. मी अनेक खेळाडूंना माझा आदर्श मानतो. उदाहरणासाठी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव तसेच इतर मोठे खेळाडू. या सर्व दिग्गजांसोबत खेळायला मला खूप आवडते.”

“मी आयपीएलमधून खूप काही शिकलो आहे. या खेळाडूंना भेटण्याची जाणीवच वेगळी होती. मात्र, माझ्या प्रशिक्षण संघाने जाणीव करून दिली की, मी या कुटुंबाचा भाग आहे. तसेच, मला सल्ला दिला की, मी या स्टार्समुळे भारावून गेलो नाही पाहिजे. मला वाटते की, यामुळे मला खूप मदत झाली,” असेही पुढे बोलताना ब्रेविस म्हणाला.

ब्रेविसने एमआय केप टाऊन संघातील त्याच्या अनुभवाबद्दल सांगितले की, तो एसए20 (SA20) स्पर्धेत प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. तो म्हणाला की, “तुम्ही त्यांच्याकडून शिकता ती हीच नवीन गोष्ट आहे. ते तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देतात. हाशिम अमला, एक अद्भूत प्रशिक्षक आणि व्यक्ती आहे. त्यामुळे ते माझ्यात शांती घेऊन येतात. तसेच, मला अनेक गोष्टी पुढे घेऊन जाण्यात मदतही करतात.”

तो पुढे म्हणाला की, “प्रशिक्षक सायमन हेदेखील प्रशिक्षकाच्या रूपात अद्भूत आहेत. त्यामुळे नेहमी त्यांना गोष्टी सांगण्याचा आणि त्यांच्याकडून शिकण्याचा वेळ असतो. आम्ही नेहमीच माझ्या फलंदाजीबाबत सुरू असलेल्या गोष्टींबाबत बोलतो. त्यामुळे सर्व प्रशिक्षक इतकी चांगली माहिती शेअर करतात की, त्या तुम्ही तुमच्या खेळात वापरू शकता.”

“वास्तवात एसए20 स्पर्धेतील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. न्यूलँड्समध्ये एमआय केप टाऊनचे घरचे मैदान आमच्यासाठी विशेष स्थान आहे. आमच्याकडे आधीपासूनच या खास आठवणी होत्या,” असेही तो पुढे म्हणाला.

स्पर्धेतील ब्रेविसची कामगिरी
ब्रेविसने सध्याच्या एसए20 स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या सामन्यात वादळी खेळी करत 70 धावा कुटल्या होत्या. त्याच्या स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 6 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 27च्या सरासरीने 135 धावांचा पाऊस पाडला आहे. (cricketer dewald brevis learned a lot from rohit sharma suryakumar yadav in ipl)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी बुमराहचा गोलंदाजी सराव, व्हिडिओ जोरदार व्हायरल
न्यूझीलंडचा अर्धा संघ 15 धावांवर तंबूत पाठवूनही शमी आणि सिराजने का टाकल्या फक्त 6 ओव्हर?


Previous Post

‘मलाही माहीत आहे की…’, शतकांच्या दुष्काळाविषयी रोहित शर्माने सोडले मौन

Next Post

‘फक्त हे काम कर, मग जगावर राज्य करशील’, अनुभवी शमीचा ‘वेगाच्या बादशाह’ला मोलाचा सल्ला

Next Post
Mohammed-Shami-And-Umran-Malik

'फक्त हे काम कर, मग जगावर राज्य करशील', अनुभवी शमीचा 'वेगाच्या बादशाह'ला मोलाचा सल्ला

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In