ऑस्ट्रेलिया संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. फेब्रुवारी- मार्च महिन्यातील या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत असणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने मैदानावर पुनरागमन केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत बुमराह नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्याविरुद्ध नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. खरं तर, बुमराह मागील दीर्घ काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. बुमराहला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) स्पर्धेपूर्वी संघात पुनरागमन करायचे आहे. त्यासाठी तो कसून सराव करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, जसप्रीत बुमराह जुलै 2022मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर कंबरेच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता. तसेच, मागील वर्षी आशिया चषकातही त्याला सामील होता आले नव्हते. त्यानंतर टी20 विश्वचषक पाहता भारताचा गोलंदाजी विभाग मजबूत करण्यासाठी बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील टी20 मालिकेतही सामील करण्यात आले होते. मात्र, तिथेही तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आणि अनिश्चित काळासाठी संघाबाहेर झाला होता. बुमराहने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 25 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
नुकतेच श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या वनडे मालिकेत त्याला ताफ्यात निवडले गेले होते. मात्र, नंतर बीसीसीआयने सांगितले की, त्यांना बुमराहबाबत घाई करायची नाहीये. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला.
पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बुमराह संघाबाहेर
विशेष म्हणजे, आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, त्यामध्ये जसप्रीत बुमराह याच्या नावाचा समावेश नाहीये. आता उर्वरित 2 कसोटी सामन्यात बुमराहला ताफ्यात सामील केले जाते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (pacer jasprit bumrah resumes bowling in nets ahead of border gavaskar trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितने पुन्हा दाखवून दिलं त्याला ‘हिटमॅन’ का म्हणतात, भारताच्या वनडे विजयात गांगुलीपेक्षाही जास्त योगदान
जोडी जबरदस्त! रोहित-गिलने 2023मध्ये गाजवलं वनडे क्रिकेट, 5 डावांमध्ये ठोकल्या चारशेहून अधिक धावा