---Advertisement---

ऐतिहासिक ‘गॅबा’ विजयाला दोन वर्ष पूर्ण! जेव्हा भारताच्या जखमी वाघांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात केले परास्त

Team India
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी ब्रिस्बेनमधील द गॅबा हे स्टेडियम बालेकिल्ला मानले जाते. या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचे स्वप्न असते. विशेष म्हणजे गेल्या 34 वर्षात केवळ एकदाच ऑस्ट्रेलिया संघ द गॅबा येथे पराभूत झाला आहे आणि ही अतुलनीय कामगिरी भारतीय संघाने केली आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयाला आज म्हणजेच 19 जानेवारी रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. 

भारताने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या नेतृत्त्वाखाली 15 ते 19 जानेवारी 2021 दरम्यान द गॅबा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना खेळला. हा सामना भारतीय संघाने 3 विकेट्सने जिंकला होता. या विजयासह भारताने 2-1 अशा फरकाने कसोटी मालिका देखील जिंकण्याचा कारनामा केला होता. भारताचा ऑस्ट्रेलियन भूमीतील हा सलग दुसरा कसोटी मालिका विजय होता. 

दिग्गजांची अनुपस्थिती
भारतासाठी द गॅबा येथे मिळवलेला विजय खास ठरला कारण, भारताने अनेक दिग्गजांच्या अनुपस्थिती हा सामना खेळला होता. त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) पालकत्व रजेवर होता. तर, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, केएल राहुल, रविंद्र जडेजा असे खेळाडू दुखापतग्रस्त होते. त्यामुळे भारताचा संघ युवा आणि अनुभवी खेळाडूंनी भरलेला होता. असे असतानाही भारतीय संघाने अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पराभवाची धूळ चारली होती.

ब्रिस्बेनमध्ये असा मिळवला विजय – 
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर 369 धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने तळातील फलंदाज शार्दुल ठाकून (67) आणि वॉशिंग्टन सुंदर (62) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात 336  धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 294 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक 5 विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील 33 धावांच्या आघाडीसह 328 धावांचे आव्हान दिले होते.

प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने 89 धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने 22 धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना 56 धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे. विशेष म्हणजे भारताला अखेरच्या दिवशी तब्बल 324 धावांची गरज होती. पण पंत, गिल आणि पुजारा यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारताने हे आव्हान पूर्ण केले आणि इतिहास रचला.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने 1 विकेट घेतली.

व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी

भारताने 2-1ने जिंकली मालिका
या कसोटी मालिकेची सुरुवात भारतासाठी खास झाली नव्हती. भारताने ऍडलेड येथे झालेला पहिला सामना 8 विकेट्सने गमावला होता. मात्र यानंतर भारताने यशस्वी पुनरागमन केले आणि मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना 8 विकेट्सने जिंकला. यानंतर सिडनी येथे झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ब्रिस्बेनचा सामना निर्णायक कसोटी सामना ठरणार होता. पण, ब्रिस्बेनमधील सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेवर 2-1ने कब्जा केला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का! स्टार खेळाडू डोपिंग चाचणीत पाॅझिटिव्ह
द्विशतक होताच सचिनकडून साराचा शुबमनसोबत साखरपुडा फिक्स? ट्विट होतंय व्हायरल

 

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---