क्रिकेटटॉप बातम्या

रोहितने पुन्हा दाखवून दिलं त्याला ‘हिटमॅन’ का म्हणतात, भारताच्या वनडे विजयात गांगुलीपेक्षाही जास्त योगदान

रोहित शर्मा याने त्याला ‘हिटमॅन‘ का बोलले जाते, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने बलाढ्य न्यूझीलंड संघाला 8 विकेट्सने पराभूत केले. हा विजय भारतासाठी सुखावणारा होता. कारण, या विजयामुळे भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली. या विजयासोबतच भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानेही खास विक्रम केला. त्याने भारताकडून वनडे विजयात सर्वाधिक धावांचे योगदान देण्याच्या बाबतीत माजी कर्णधार सौरव गांगुली याला मागे टाकले.

दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी रोहितने थोडा वेळ घेतला. कारण, नाणेफेकीवेळी काय निर्णय घ्यायचा, हेच तो विसरला होता. मात्र, त्याचा हा निर्णय संघाच्या जबरदस्त गोलंदाजांनी योग्य ठरवला. यावेळी न्यूझीलंड संघाला 34.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 108 धावाच करता आल्या. हे आव्हान भारताने 20.1 षटकात गाठले. भारताने 2 विकेट्स गमावत 111 धावा करत आव्हान पूर्ण केले. यामध्ये रोहितने अर्धशतकाचे योगदान दिले होते.

रोहितने भारताच्या विजयात 50 चेंडूत 51 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 7 चौकार मारले. यासह त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. रोहितनने वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या विजयात सर्वाधिक धावांचे योगदान देण्याच्या बाबतीत सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला मागे टाकले. रोहितने अर्धशतक करताच वनडेत भारताच्या विजयात आतापर्यंत 6822 धावांचे योगदान दिले. यासह तो यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला. चौथ्या स्थानी असलेल्या गांगुलीने भारताच्या वनडे विजयात एकूण 6818 धावांचे योगदान दिले होते.

भारताच्या वनडे विजयात सर्वाधिक धावांचे योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर याचा पहिला क्रमांक लागतो. सचिनने भारताच्या विजयात एकूण 11157 धावांचे योगदान दिले आहे. सचिननंतर या यादीत दुसऱ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने भारताच्या वनडे विजयात एकूण 9173 धावांचे योगदान दिले आहे. (Rohit surpasses sourav Ganguly tally of ODI runs in Wins)

भारताच्या वनडे विजयात सर्वाधिक धावांचे योगदान देणारे खेळाडू
11157 धावा- सचिन तेंडुलकर
9173 धावा- विराट कोहली
6822 धावा- रोहित शर्मा*
6818 धावा- सौरव गांगुली

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोडी जबरदस्त! रोहित-गिलने 2023मध्ये गाजवलं वनडे क्रिकेट, 5 डावांमध्ये ठोकल्या चारशेहून अधिक धावा
दुसऱ्या वनडेत भारताच्या गोलंदाज अन् फलंदाजांची हवा! न्यूझीलंडला धूळ चारत मालिका घातली खिशात

Related Articles