---Advertisement---

VIDEO | रोहित शर्मा बनला गजनी! नाणेफेक जिंकला पण नेमकी ‘ही’ गोष्टच विसरला

Rohit Sharma Funny Video
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 12 धावांनी जिंकला होता. अशात आता दुसऱ्या सामन्यात देखील भारताने नाणेफेक जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेण्याआधी चाहत्यांना एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. 

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय अगदी योग्य ठरला आणि भारताने सामना देखील जिंकला. दुसऱ्या वनडे सामन्यात देखील नाणेफेकीवेळी रोहितला यश मिळाले. पण नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितला प्रथम फलंदाजी घ्यावी की, प्रथम गोलंदाजी घ्यावी, असा प्रश्न पडल्याचे चाहत्यांना पाहायला मिळाले. हा मजेशीर प्रसंग पाहून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाल्याचे पाहायला मिळाले. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुपान व्हायरल होत आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने त्याचा निर्णय सांगणे अपेक्षित होते. पण हा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली. रोहित नाणेफेकील येण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये संघ सहकाऱ्यांशी या निर्णयाविषयी चर्चा करून आला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा त्याला विसर पडला. अखेर काही मिनिट विचार केल्यानंतर अखेर रोहितने प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवला. त्यावेळी उपस्थित असलेला न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) देखील स्वतःचे हसू रोखू शकला नाही. या प्रसंगानंतर रोहित शर्माविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांना त्याला ट्रोल करण्यासाठी आयते भांडवल मिळाले आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

न्यूजीलैंड – फिन एलेन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिशेल सेंटनर, हेनरी शिपली, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर.
(After winning the toss, Rohit Sharma forgot what to decide)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या सहकाऱ्याची अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, गरोदर पत्नीवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या चुकीच्या कमेंट्स
रायपूरमध्ये पहिल्यांदाच खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या खेळपट्टी आणि स्टेडियमच्या इतिहासाविषयी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---