भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा चांगलाच चर्चेत राहिला. रोहितने लक्ष्याचा पाठलाग करताना अर्धशतक ठोकले आणि संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. असे असले तरी, रोहितचे वनडे शतक यावेळीही होऊ शकले नाही. मागच्या मोठ्या काळापासून रोहित वनडे फॉरमॅटमध्ये शतक करू शकला नाहीये. सामना संपल्यानंतर रोहित त्याच्या फॉर्मविषयी खास प्रतिक्रिया दिली.
भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील हा दुसरा सामना रायपूरच्या वीर नारायण स्टेडियवर खेळला गेला. याठिकाणी खेळला गेलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असून खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल ठरली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला भारताने श्वस्तात बाद केले. प्रत्युत्तरात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली आणि विजय देखील मिळवून दिला. रोहितने 50 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. पण सामना संपल्यानंतर तो स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही रोहितने सांगितले. रोहित मागच्या जवळपास तीन वर्षांपासून एकही वनडे शतक करू शकला नाहीये.
मोठी धावसंख्या करता येत नाहीये – रोहित शर्मा
रोहितने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शेवटचे वनडे शतक केले होते. याविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मी आता स्वतःच्या खेळात बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. गोलंदाजांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटते स्वतःवरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न खूप महत्वाचा आहे. मला माहिती आहे मी मोठी धावसंख्या करत नाहीये. पण ठीक आहे, मी याविषयी जास्त चिंता करत नाही.”
दरम्यानच्या काळात रोहित अपेक्षित प्रदर्शन करू शकला नसला, तरी त्याने वनडे क्रिकेटमध्ये यापूर्वी संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. रोहितच्या नावावर तीन वनडे द्विशतकांची नोंद आहे. अशी कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर कोणत्याच फलंदाजा जनली नाहीये. वनडे फॉरमॅटमध्ये रोहितने आतापर्यंत 240 सामने खेळले आहेत, ज्यात 48.64 च्या सरासरीने 9681 धावा केल्या आहेत. (Rohit Sharma’s special reaction to poor form)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी बुमराहचा गोलंदाजी सराव, व्हिडिओ जोरदार व्हायरल
न्यूझीलंडचा अर्धा संघ 15 धावांवर तंबूत पाठवूनही शमी आणि सिराजने का टाकल्या फक्त 6 ओव्हर?