भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घाट घातलेल्या महिला आयपीएलची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. नुकतेच स्पर्धेसाठीचे ब्रॉडकास्टिंग राइट्स वायकॉम 18 ने तब्बल 951 कोटी रुपयांना आपल्या नावे केले. त्यानंतर आता स्पर्धेच्या पुढील नियोजनाबाबत वृत्त समोर येत आहे. त्यामध्ये खेळाडूंचा पुरुष आयपीएलप्रमाणेच लिलाव होणार असून, प्रत्येक संघाकडे किती रक्कम असेल याबाबत माहितीसमोर येतेय.
मागील अनेक वर्षांपासून महिला आयपीएल सुरू करण्याबाबत बीसीसीआय प्रयत्नशील होती. आता याला यावर्षी मूर्त स्वरूप प्राप्त होईल. सध्या बीसीसीआयने पाच संघांसाठी निविदा मागवल्या असून, हे पाच संघ कोणत्या शहराचे असतील हे 25 जानेवारी रोजी उघड केले जाईल. काही आयपीएल फ्रॅंचाईजींनी आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्यासाठी रस दाखवला आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, महिला आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव होईल. यासाठी प्रत्येक संघाकडे केवळ 12 कोटी इतकीच रक्कम असेल. पुरुष आयपीएलच्या तुलनेत हा आकडा फारच लहान आहे. पुरुष आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे 95 कोटी रुपयांची रक्कम होती. विशेष म्हणजे आयपीएल 2023 च्या पुरुष आयपीएलच्या लिलावात तब्बल पाच खेळाडू 12 कोटींपेक्षा जास्त रकमेत विकले गेले होते.
यावर्षी महिला आयपीएलमध्ये 12 कोटी इतकी पर्स उपलब्ध करून दिली असली तरी, पुढील पाच वर्षे यामध्ये प्रत्येकी दीड कोटींची वाढ होत राहील. महिला आयपीएलचे पहिले तीन हंगाम पाच संघांसह खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर ही संख्या एकने वाढेल. तसेच, या स्पर्धेत अंतिम अकरामध्ये पाच विदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी असेल. त्यापैकी एक खेळाडू सहयोगी देशांची असणार आहे. मार्च महिन्यात पुरुष आयपीएलआधी ही स्पर्धा मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियम व डी.वाय पाटील स्टेडियम येथे खेळली जाईल.
(Purse For Womens IPL Will Be 12 Crore Reports)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फॅशन शोमधील मॉडेल निवडा मग संघात…’, सरफराज खानच्या मुद्यावरून गावसकर संतापले
एमसीसीकडून ‘मांकडिंग’ नियमात बदल! एडम जम्पाच्या वादानंतर घेतला मोठा निर्णय