एमसीसीकडून ‘मांकडिंग’ नियमात बदल! एडम जम्पाच्या वादानंतर घेतला मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने स्वीकार केले की, नॉन स्ट्रायकर एंडवरील फलंदाजाला धावबाद करण्यासंबंधीच्या नियमात काही त्रुटि होत्या. बीग बॅश लीग म्हणजेच बीबीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पिरकीपटून एडम जम्पा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. जम्पाने नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची स्वतःचीच एक चूक समोर आली. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (19 जानेवारी) एमसीसीने या नियमात सुधारणा केली आहे.
मेलबर्न स्टार्सचा कर्णधार एडम जम्पा (Adam Zampa) याने मेलबर्न रेनेगेड्सचा फलंदाज टॉम रॉजर्स (Tom Rogers) याला नॉन स्ट्राईकवर धावबाद (मांकडिंग) करण्याचा प्रयत्न केला, पण तिसऱ्यां पंचांनी लक्ष घातल्यानंतर जम्बा स्वतःच एक चूक करत असल्याचे समोर आले. त्याने फॉलो थ्रू (एक्शन) पूर्ण केल्यानंतर स्ट्रईकवरील फलंदाजाला चेंडू टाकणे अपेक्षित होते, पण तो मागे वळला आणि चेंडू नॉन स्ट्राईकवरील स्टंप्सला लावला. जम्पाने यानंतर पंचांकडे रॉजर्सच्या विकेटसाटी अपील केली. पण पंचांनी मात्र निर्णयासाठी तिसऱ्या पंचांकडे धाव घेतली. तिसऱ्या पंचांनी या प्रकरणावर भाष्य करताना असे सांगितले की, जम्पाचा हात चेंडू सोडण्यासाठी ‘वर्टिकली’ खूप पुढे गाला होता.
गुरुवारी एमसीसीने बीबीएलच्या या प्रसंगानंतर एक महत्वाचा निर्णय घेतला नियमात सुधारणा केली. एमसीसीकडून असे सांगण्यात आले की, पंचांनी योग्य निर्णय घेतला. नियमाच्या मांडणीत काही शंका होत्या, ज्यामुळे अशा अडचणी उभ्या राहिल्या असतील. आता नियम 38.3 च्या शब्दांमध्ये बदल केले गेले असून नियमात अधिक स्पष्टता आली असेल. नियम 38.3.2 आता असे सांगतो की, “चेंडू ज्याठिकाणावरून टाकला जातो, त्याठिकाणी गोलंदाज एकदा पोहोचल्यानंतर फलंदाजाने जरी स्ट्राईक सोडली, तरी गोलंदाज त्याला नॉन स्ट्राईकवर बाद करू शकणार नाही.” एमसीसीने असेही सांगितले की, “आम्ही समजू शकतो की, पंच आणि खेळाडूंना नियम चांगल्या पद्धतीने समजतात. पण नियमाची शब्दशः मांडणी थोडी अवघड होती, ज्यामुळे अडचणी येऊ शकत होत्या.”
एडम जम्पाप्रमाणेच मागच्या काही दिवसांमध्ये अनेकदा मैदानात गोलंदाजांनी ‘मांकडिंग’ म्हणजेच नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाजांना बात करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा गोलंदाजांचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आणि फलंदाजी करणाऱ्या संघाची मात्र चांगलीच निराशा होते. भारतीय महिला संघाची अष्टपैलू दीप्ती शर्मा देखील याचा कारणास्तव चांगलीच चर्चेत आली होती, जेव्हा तीने इंग्लंडविरुद्दच्या सामन्यात नॉन स्ट्राईकवरील इंग्लिश फलंदाजाला धावबाद केले होते. त्याव्यतिरिक्त भारताचा रविचंद्रन अश्विन देखील अनेकदा असे करताना दिसला आहे. (Change in the ‘Mankding’ rule from MCC! A big decision was taken after Adam Zampa’s controversy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजाराच्या संघात खेळणार स्मिथ! पाकिस्तानचा उपकर्णधारही दाखवणार सोबतच दम
हॉकी विश्वचषक: अखेरच्या सामन्यातही टीम इंडियाचा विजय, थेट उपांत्यपूर्व फेरीची संधी मात्र हुकली