Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॉकी विश्वचषक: अखेरच्या सामन्यातही टीम इंडियाचा विजय, थेट उपांत्यपूर्व फेरीची संधी मात्र हुकली

January 19, 2023
in टॉप बातम्या, हॉकी
Photo Courtesy: Twitter/Hockey India

Photo Courtesy: Twitter/Hockey India


ओडीसा येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात गुरुवारी (19 जानेवारी) भारत विरुद्ध वेल्स असा सामना झाला. थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात 8 गोलाच्या फरकाने सामना जिंकणे गरजेचे होते. मात्र, वेल्सने अखेरच्या सामन्यात आपला खेळ उंचावत भारताला कडवी झुंज दिली. भारताने 4-2 असा विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले.

Jeet gaya bhai jeet gaya, India jeet gaya 🤩

🇮🇳 IND 4-2 WAL 🏴󠁧󠁢󠁷󠁬󠁳󠁿#INDvsWAL #HockeyIndia #IndiaKaGame #HWC2023 #HockeyWorldCup2023 #StarsBecomeLegends @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI @HockeyWales pic.twitter.com/r6xv70ZjhW

— Hockey India (@TheHockeyIndia) January 19, 2023

 

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारत मोठ्या विजयाच्या अपेक्षेने मैदानात उतरला. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात विजय तर दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधली होती. दुसरीकडे, वेल्सने दोन्ही सामने गमावल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलेले. भारताला या सामन्यातून थेट उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी 8 गोलाच्या फरकाने विजय मिळवणे अनिवार्य होते.

वेल्सने या सामन्यात भारताला झुंज देत पहिल्या क्वार्टर मध्ये एकही गोल करू दिला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 22 व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करत खाते उघडले. मात्र, तरीही भारताला आक्रमकतेने खेळ करता आला नाही. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला आकाश टिपणे गोल करत आघाडी वाढवली. मात्र, त्या क्वार्टरच्या अखेरीस वेल्सने दोन गोल करत सामना बरोबरीत आणला.  शेवटचा क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा हरमनप्रीत व आकाशदीप यांनीच गोल करत 4-2 अशी आघाडी मिळवून दिली. अखेर याच फरकावर सामना भारताने जिंकला.

‌ या गटात अव्वलस्थानी राहत इंग्लंडने थेट उपांत्यपूर्व फेरी खेळण्यासाठी पात्रता मिळवली. तर भारताला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध क्रॉस ओव्हर सामना खेळावा लागेल.

(Hockey World Cup India Beat Wales By 4-2)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाने विराटला दिला रणजी खेळण्याचा सल्ला; म्हणाले, “न्यूझीलंडविरुद्ध…”
पाकिस्तानची नाचक्की सुरूच! तीन दिग्गजांनी मुख्य प्रशिक्षक होण्यास दिला नकार


Next Post
Photo Courtesy: Twitter/Sussex CC

पुजाराच्या संघात खेळणार स्मिथ! पाकिस्तानचा उपकर्णधारही दाखवणार सोबतच दम

Photo Courtesy; Twitter

टीम इंडियाची गोलंदाजी फोडणारा 'तुफानी' ब्रेसवेल आहे तरी कोण? रक्तातच आहे क्रिकेट

Photo Courtesy: Twitter/ICC

एमसीसीकडून 'मांकडिंग' नियमात बदल! एडम जम्पाच्या वादानंतर घेतला मोठा निर्णय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143