मागच्या काही रणजी हंगामांमध्ये सरफराज खान हे नाव सर्वांच्याच तोंडात आहे. सद्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीत देखील सरफराज अशाच पद्धतीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. मात्र, अद्याप भारतीय संघाकडून त्याला संधी मिळत नाहीये. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बीसीसआयने संघ घोषित केला आणि या संघात देखील सरफराजला संधी मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीवर जोरदार टीका केली आहे.
मागच्या तीन रणजी हंगामांमध्ये सरफराज खान (Sarfaraz Khan) याच्या बॅटमधून 2441 धावा निघाल्या आहेत आणि हे सत्र अजूनही सुरूच आहे. मुंबई संघासाठी खेळणाऱ्या या फलंदाजाने 2020 पासून आतापर्यंत एक तिहेरी शतक, दोन द्विशतक आणि 12 शतकांच्या जोरावर या धावा केल्या आहेत. असे असले तरी निवडकर्त्यांनी वारंवार त्याला राष्ट्रीय संघातून वारंवार डावलल्याचे पाहायला मिळते. ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौरा करणार आहे. सरफराजचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील फॉर्म पाहता त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेत संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र यावेळी देखील निवडकर्त्यांनी त्याला डावलले. टी-20 फॉरमॅट गाजवत असलेल्या सूर्यकुमार यादवला सरफराजच्या ऐवजी कसोटी संघात प्रधान्य दिल्यामुले अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या संघात सूर्यकुमारचे नाव सामील केले गेल्याने तो लवकरच भारतासाठी कसोटी पदार्पण करू शकतो. सरफराजला संघात संधी न मिळण्याचे कारण अनेकदा त्याची फिटनेस असल्याचे सांगितले जाते. याविषयी बोलताना सुनली गावसकर (Sunil Gavaskar) यांनी निवड समितीला चांगलेच खडेबोल सुनावले. गावसकर म्हणाले, “जर तुम्ही अनफिट आहात, तर तुम्हाला शतक करता येणार नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये फिटनेस सर्वात गरजेची आहे. तुम्ही यो-यो चाचणी करता, त्याच्याशी मला काही अडचण नाही. पण योग्यता मोडण्यासाठी ही एकमात्र पद्धत नाहीये. कोणताही व्यक्ती क्रिकेट खेळण्यासाठी फिट असेल, मला वाटत नाही की, या सर्व गोष्टींना महत्वाच्या असतात.”
“सरफराज शतक करत आहे आणि क्रिकेट खेळण्यासाठी फिट आहे. जर तुम्हाला सडपातळ खेळाडू हवे असतील, तर तुम्ही एखाद्या फॅशन शोमध्ये जाऊ शकता. त्याठिकाणी काही मॉडल निवडा. त्याच्या हाताता एक बॅट आणि बॉल देऊन त्यांना संघात सामील करू शकता. तुमच्याकडे सर्व आकारांचे खेळाडू आहेत. आकाराकडे पाहू नका, धावा आणि आकडेवारीकडे लक्ष द्या,” असे गावसकर पुढे म्हणाले. (If you are not going to include a batsman like Sarfraz Khan in the team, go to a fashion show and choose a model says Sunil Gavaskar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एमसीसीकडून ‘मांकडिंग’ नियमात बदल! एडम जम्पाच्या वादानंतर घेतला मोठा निर्णय
पुजाराच्या संघात खेळणार स्मिथ! पाकिस्तानचा उपकर्णधारही दाखवणार सोबतच दम