जगभरात नवनवीन टी20 लीग सुरू होताना दिसत आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका लीगचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिका देशात पहिल्यांदाच एसए20 च्या रूपात टी20 लीग स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू भाग घेत आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील अधिकतर फ्रँचायझीचे मालक आयपीएल फ्रँचायझी मालक आहेत. अशात एमएस धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना किंवा भारतीय संघातील इतर निवृत्त खेळाडूंना या स्पर्धेत संधी दिली जाऊ शकते का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आयपीएल खेळत असल्यामुळे काही खेळाडूंसाठी हे शक्य नाहीये, पण स्पर्धेचा आयुक्त ग्रॅमी स्मिथ हा एमएस धोनीसाठी खूपच उत्सुक आहे.
माध्यमांशी संवाद साधताना स्पर्धेचा आयुक्त आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) याला याविषयी विचारणा केली असता, तो त्याने एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासोबत करार करण्याच्या शक्यतेविषयी मोठे भाष्य केले. तो म्हणाला की, “धोनीसाठी भविष्यात या लीगमध्ये सामील होण्याचे दरवाजे उघडे आहेत. तो एक उत्तम कर्णधार आणि उत्तम खेळाडू आहे.”
काय म्हणाला स्मिथ?
धोनीसोबत करार करण्याच्या शक्यतेविषयी विचारले असता, स्मिथ म्हणाला की, तो बीसीसीआय आणि त्यांच्या नियमांचा आदर करतो. मात्र, जर धोनीसारख्या व्यक्तीला घेण्याची संधी मिळाली, तर तो कसलाही संकोच करणार नाही. तो म्हणाला, “त्याच्यासारखा खेळाडू असणे आश्चर्यकारक असेल. मात्र, जसे मी आधीच म्हणालो आहे, आम्ही नेहमीच बीसीसीआयसोबत काम करतो आणि त्यांचा सन्मान करतो. तथ्य हे आहे की, आमचे त्यांच्यासोबत कामाचे चांगले संबंध निर्माण केले आहेत. ते आयपीएल किंवा जागतिक स्पर्धेसारख्या आयोजनाबाबत खूप अनुभवी आहेत. तसेच, एसए20साठी हे एक खूपच महत्त्वपूर्ण संबंध असेल. आम्ही आमच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले. आमच्याकडे काही संधी आहेत.”
‘धोनीमुळे लीगचे मूल्य वाढेल’
ग्रॅमी स्मिथ म्हणाला, “आमची अशी इच्छा आहे की, धोनीसारखा खेळाडू आमच्या लीगमध्ये सामील झाला, तर या लीगचे मूल्य वाढेल. तो युवा खेळाडूंना खूप काही शिकवू शकतो. तो लीगमध्ये सामील झाला, तर दक्षिण आफ्रिकेला अभिमान वाटेल. संधी मिळाल्यास मी माहीला इथे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “अनेक वर्षे त्याच्यासोबत आणि त्याच्याविरुद्ध खेळलो आहे. त्याला माहिती आहे की, संघ कसा चालवला पाहिजे आणि कशाप्रकारे खेळाडूंमधील प्रतिभा शोधली जात आहे.”
आता एमएस धोनी आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेतील एसए20 या स्पर्धेत भाग घेतो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (sa20 a player like dhoni graeme smith made big statement on former skipper ms dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या बोर्डालाच लावला चुना; आयसीसीची तब्बल ‘इतक्या’ कोटीची फसवणूक
“जास्तीत जास्त टी10 लीग खेळवा”, भारताच्या जगज्जेत्या खेळाडूंनी केली मागणी