क्रिकेटटॉप बातम्या

आयपीएल क्रश काव्या मारनची जादू दक्षिण आफ्रिकेतही चालली, लाईव्ह सामन्यात आली लग्नासाठी मागणी

सध्या दक्षिण आफ्रिकेत एसए20 लीग खेळली जात आहे. आयपीएलच्या धरतीवर आयोजित केल्या गेलेल्या या लीगमध्ये चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. सनरायझर्स ईस्टर्न केप आणि पार्ल रॉयल्स यांच्यात गुरुवारी (19 जानेवारी) आमना सामना झाला. सनरायझर्स फ्रँचायझीची मालकीण काव्या मारन तिच्या संघाचा चीअर करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. लीगदरम्यान एका सामन्यात आफ्रिकी चाहत्याने मोठे धाडस दाखवत मारनलाच लग्नाची मागणी घातली आहे.

गुरुवारी (19 जानेवारी) काव्या मारन () हिच्या मालकिचा सनरायझर्स ईस्टर्न केप आणि पार्ल रॉयल्स संघात रोमांचल लढत पाहायला मिळाली. पार्लच्या बोलंड पार्क स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. सनरायझर्स ईस्टर्न केप संघाने या सामन्यात 5 विकेट्स राखून विजय मिळवला. काव्या मारन चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. यापूर्वी आयपीएल सामन्यांमध्ये ती अनेकदा सनरायझर्स संघाला चीअर करण्यासाठी उपस्थित राहिली आहे. काव्या जेव्हा कधी लाईव्ह सामन्यात उपस्थित असते, तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. एसए20 लीगमध्ये देखील असेच काहीसे चित्र आता पाहायला मिळाले आहे.

सनरायझर्स ईस्टर्स केप आणि पार्ल रॉयल्स संघात सामना सुरू असताना मैदानात उपस्थित एका चाहत्याने थेट काव्या मारनला लग्नाची मागणी घातली आहे. या चाहत्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आधी भारतात मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग असणारी काव्याचे चाहते आता विदेशात देखील वाढू लागले आहेत, असेच यावरून पाहायला मिळते. सामना सुरू असताना काव्या स्टॅन्ड्समध्ये तिच्या जागी बसली असताना कॅमेरा मैदानातील एका चाहत्याकडे वळवला गेला. या चाहत्याच्या हातात एक पोस्टर दिसते, ज्यावर “काव्या मारन, तू माझ्याशी लग्न करशील?” असा प्रश्न विचारला गेला आहे. सोशल मीडियावर सध्या हा विषय चर्चेत आहे. एसए20 लीगच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

दरम्यान, काव्या सन नेटवर्कचे मालक कलानिधि मारन यांची मुलगी आहे. मागच्या काही वर्षांमध्ये काव्या सनरायझर्स फ्रँचायझीचा कारभार पाहत असल्याचे दिसते. आयपीएलमध्ये चाहत्यांना काव्या पहिल्यांदा पाहायला मिळाली, तेव्हा मिस्ट्री गर्ल म्हणून तिची चांगलीच चर्चा झाली. आता तिचे ओखळ सर्वांना माहिती असली तरी, माध्यमांमध्ये आयपीएल क्रश असा तिचा ओल्लेख केला जातो. (In the SA20 league, Kavya Maran was asked to marry her in a live match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फॅशन शोमधील मॉडेल निवडा मग संघात…’, सरफराज खानच्या मुद्यावरून गावसकर संतापले
एमसीसीकडून ‘मांकडिंग’ नियमात बदल! एडम जम्पाच्या वादानंतर घेतला मोठा निर्णय

Related Articles