जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंमध्ये विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराटचे इंस्टाग्रामवर तब्बल 242 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. विराटची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहे. विराट क्रिकेटच्या मैदानापासून ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींचा वापर करतो, याची नेहमीच चर्चा रंगलेली असते. मात्र, विराट कोणता फोन वापरतो? असाही प्रश्न चाहत्यांना पडतो. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
विराट कोहलीने फोनसोबतचा फोटो केला शेअर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने नुकतेच विराट कोहली (Virat Kohli) याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराट कोहली मोबाईल (Virat Kohli Mobile) हातात घेऊन चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या हातात एक नाही, तर दोन मोबाईल आहेत. विराटच्या हातात एक ऍप्पलचा आयफोन आणि दुसरा फोल्डेबल मोबाईल आहे. फोल्डेबल मोबाईलची किंमत जवळपास एक लाख रुपये आहे. तसेच, आयफोनची किंमत एक लाख रुपयांहूनही जास्त आहे.
The wait is over and Virat Kohli is in Bengaluru! 😍
Happy HOMECOMING, KING! 👑#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 @imVkohli pic.twitter.com/13rZ1oHWfz
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 25, 2023
यापूर्वी विराटने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तो फोनसोबत दिसत आहे. विराटने हातात जो फोन पकडला आहे, त्याचा रंग निळा आहे. त्याने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “माझा आवडता निळा,” असे लिहिले आहे. यानंतर विराटचे चाहते आणि गॅजेटविषयी माहिती असणारे लोकही विचारात पडले आहेत की, विराट वापरत असलेला फोन कोणत्या ब्रँडचा आहे.
https://www.instagram.com/p/CgexoEuvSUj/?utm_source=ig_embed&ig_rid=8aef9009-8c27-4653-aac2-0b242ab44d46
विराट वापरतो विवो व्ही25 सीरिजचा फोन?
मात्र, विराट कोहली याव्यतिरिक्त आयफोनही वापरतो. मात्र, गॅजेटविषयी माहिती असणाऱ्या लोकांच्या माहितीनुसार, विराट कोहलीच्या हातात दिसणारा फोन हा विवो व्ही25 (Vivo V25) सीरिजचा फोन आहे. मात्र, विवोने आतापर्यंत हा फोन अधिकृतरीत्या बाजारात लाँच केला नाहीये. मात्र, असे म्हटले जात आहे की, विराट हा विवोचा ब्रँड एम्बेसेडर आहे, त्यामुळे त्याला लाँचपूर्वी मोबाईल मिळणे ही सामान्य बाब आहे. मात्र, सोशल मीडियावर अनेक युजर्स म्हणत आहेत की, हा एक मार्केटिंगचा स्टंट असू शकतो. (cricketer virat kohli mysterious blue smartphone leaves fans confused iphone apple rcb ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या वाघाचे ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मराठमोळ्या अंदाजात स्वागत; नेटकरीही म्हणाले, ‘एकच छावा’
‘मी हक्कदार नव्हतेच…’, WPLची पहिली हॅट्रिक घेणारी इझी वोंग असे का म्हणाली?