इंडियन प्रीमिअर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या भलताच चर्चेत आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचा खेळाडू नवीन उल हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याशी भिडल्यामुळे विराटची चर्चा रंगली आहे. मात्र, आता तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यासाठी दिल्लीत पोहोचला आहे. बुधवारी (दि. 3 मे) विराट पत्नी अनुष्का शर्मा याच्यासोबत दिल्लीचा फेरफटका मारण्यासाठी निघाला होता. यानंतर विराटने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात त्याने क्रिकेटचा खरा बॉस कोण आहे हे सांगितले.
कोण आहे खरा बॉस?
खरं तर, विराट कोहली (Virat Kohli) याने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू सर विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “द रियल बॉस.” म्हणजेच खरे बॉस. ही विवियन रिचर्ड्स यांची जुनी व्हिडिओ मुलाखत होती. यामध्ये ते कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीनंतर आयपीएल यासारख्या टी20 लीग खेळण्याच्या आपल्या इच्छेबाबत सांगत आहेत.
या मुलाखतीत त्यांनी क्रिकेटचा सर्वात लहान प्रकाराशी असलेल्या आकर्षणाविषयी चर्चा केली. ते म्हणाले की, टी20 लीगमध्ये खेळणे पसंत करतात. रिचर्ड्स यांना आतापर्यंत सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक मानले जाते. कसोटी सामन्यांमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट हा 86.07 इतका होता. रिचर्ड्स म्हणाले की, “मी हेच म्हणालो की, लाल चेंडूने क्रिकेटमधील माझे काम संपल्यानंतर आयपीएल किंवा सीपीएलमध्ये खेळू शकलो असतो. मला चांगले वाटले असते.”
विराट-गंभीरला दंड
विराट कोहली याच्या बेंगलोरचा संघाचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स संंघाविरुद्ध 6 मे रोजी आहे. अरुण जेटली स्टेडिअममध्ये हे संघ भिडणार आहेत. सोमवारी (दि.1 मे) लखनऊविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen ul Haq) तसेच त्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यात बाचाबाची झाली होती. यानंतर बीसीसीआयने कडक कारवाई करत विराट आणि गंभीरला सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावला होता. तसेच, नवीनला 50 टक्के दंड लावला होता. लखनऊविरुद्धच्या सामन्यात विराट भलताच आक्रमक दिसला होता. तो सातत्याने आक्रमक रूप धारण करत होता. बेंगलोरने उभारलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला 108 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे हा सामना बेंगलोरने 18 धावांनी जिंकला होता. (cricketer virat kohli posted video of real boss vivian richards on social media after spat with gautam gambhir ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘नवीनचा बाप आहे कोहली’, लखनऊने नवीनचा धोनीसोबतचा फोटो शेअर करताच भडकले चाहते, पाहा कमेंट्स
तब्बल 11 ओव्हर खेळून फक्त 9 धावांवर Allout झाला ‘हा’ संघ, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कारनामा