सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून बाहेर असलेल्या शुबमन गिल याने चौथ्या कसोटीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वादळी शतक ठोकले, ज्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गिलचे हे कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक होते. गिलने शतक ठोकताच भारतीय डगआऊटमध्ये बसलेला दिग्गज फलंदाज विराट कोहली भलताच आनंदी झाला. विराट कोहलीची रिऍक्शन इतकी जबरदस्त होती की, आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
शुबमन गिलचे शतक आणि विराट कोहलीची रिऍक्शन
शुबमन गिल (Shubman Gill) हा पहिल्या दोन कसोटीतून बाहेर होता. तिसऱ्या म्हणजेच इंदोर कसोटी (Indore Test) सामन्यात त्याला संधी मिळाली होती. त्या सामन्यात त्याला छाप सोडता आली नव्हती. मात्र, चौथ्या कसोटीत त्याने पूर्ण भरपाई केली. गिलने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. अशात गिलने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याच्या शतकानंतर विराट कोहली (Virat Kohli) हादेखील आनंदी झाला होता.
The moment Shubman Gill scored his 2nd century!
The generational talent. pic.twitter.com/ckh5zLz2TK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 11, 2023
विराटने गिलच्या शतकावर डगआऊटमध्ये बसून जोरजोरात टाळ्यांचा कडकडाट केला होता. त्याच्या चेहऱ्यावर मौल्यवान हास्य होते. त्याचा यादरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खरं तर, युवा गिलला भारतीय संघाचे भविष्य म्हटले जाते. असे म्हणतात की, ज्याप्रकारे विराटने दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा वारसा पुढे चालवला, त्याचप्रमाणे गिलही आता विराटचा वारसा पुढे घेऊन जाईल.
गिलने साकारली 128 धावांची खेळी
कसोटीत धावा करण्यासोबतच फलंदाज मैदानावर किती वेळ टिकतो, हेदेखील महत्त्वाचे असते. अहमदाबाद कसोटी (Ahmedabad Test) सामन्यात शुबमन गिल याने 235 धावांचा सामना केला. त्याने यावेळी 54.47च्या स्ट्राईक रेटने 128 धावा चोपल्या. या धावा करताना गिलने 1 गगनचुंबी षटकार खेचलाच, पण त्यासोबतच 12 चौकारांचाही पाऊस पाडला. (cricketer virat kohli priceless reaction on shubman gill century vs australia ind vs aus ahmedabad 4th test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाने पार केला 300 धावांचा टप्पा, विराट-जडेजाच्या भागीदारीला पूर्णविराम; जड्डू 28 धावांवर तंबूत
कर्णधार स्मिथला विराटच्या बॅटवर संशय? ड्रिंक्स ब्रेकदरम्यान धावत येऊन तपासली बॅट, फोटो व्हायरल