भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या कसोटीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्यानंतर आता फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसे काढत आहे. यादरम्यान भारतीय चाहते विस्फोटक फलंदाज असलेल्या रिषभ पंत याची खूपच आठवण काढत आहेत. अहमदाबाद कसोटी सामन्यादरम्यान नेथन लायन याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नेथन लायन (Nathan Lyon) भारतीय फलंदाजांवर दबाव टाकत आला आहे. इंदोर कसोटी सामन्यात लायनने एकूण 11 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय फलंदाज लायनविरुद्ध नेहमीच संघर्ष करताना दिसतात. मात्र, रिषभ पंत (Rishabh Pant) हा एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने लायनची ऑस्ट्रेलियामध्ये धुलाई केली होती. मात्र, दुर्दैवाने पंत या मालिकेपूर्वीच अपघातग्रस्त झाला. त्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर असणार आहे. अशात चाहत्यांनी पंतच्या खेळीची आठवण काढत नेथन लायनसमोर त्याच्या नावाचा गजर केला.
नेथन लायनने दिली नाही प्रतिक्रिया
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नेथन लायन सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी थांबला होता. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. नेथन लायनपुढे सर्वजण रिषभ पंत नावाचा गजर करू लागले. यानंतर, लायन तिथून निघून गेला. मात्र, चाहते ‘रिषभ पंत, रिषभ पंत’ ओरडताना दिसत होते.
Get well soon Rishabh pant ????????#RishabhPant #BGT2023 #BorderGavaskarTrophy2023 #NarendraModiStadium #INDvAUS #IndiaVsAustralia pic.twitter.com/sFnfDJCrF3
— Shooter (@SHOOTER2222003) March 11, 2023
शुबमन गिल आणि विराट कोहलीची शानदार फटकेबाजी
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभा केला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानेही पाहुण्या संघाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आधी युवा फलंदाज शुबमन गिल याने शानदार शतक ठोकले. त्याने 235 चेंडूंचा सामना करताना 128 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 12 चौकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा यानेही 48 धावा केल्या. तसेच, सामन्याच्या चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत विराट कोहली याने नाबाद 88 धावा, तर केएस भरत याने नाबाद 25 धावा केल्या. (cricket fans harassed spinner nathan lyon chanting rishabh pant slogans in india vs australia 4th test video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवा शुबमनने शतक ठोकताच विराटलाही झाला प्रचंड आनंद, ‘किंग’ कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद
टीम इंडियाने पार केला 300 धावांचा टप्पा, विराट-जडेजाच्या भागीदारीला पूर्णविराम; जड्डू 28 धावांवर तंबूत