Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशीच रोहितची कामगिरी, चौथ्या कसोटीत ओलांडला मैलाचा दगड, सेहवागलाही पछाडलं

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशीच रोहितची कामगिरी, चौथ्या कसोटीत ओलांडला मैलाचा दगड, सेहवागलाही पछाडलं

March 12, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma

Photo Courtesy: bcci.tv


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या वादळी फलंदाजीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. जेव्हा रोहित लयीत येतो, तेव्हा भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडल्याशिवाय राहत नाही. रोहितची गणना जगातील सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये होते. सध्या तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिले दोन कसोटी सामने जिंकले होते. मात्र, तिसऱ्या सामन्यता ऑस्ट्रेलियाकडून 9 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबाद येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात रोहितने फक्त 21 धावा करताच ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे ती कामगिरी…

रोहितच्या 17000 धावा पूर्ण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 21 धावा करताच त्याने कारकीर्दीतील 17000 (Rohit Sharma Complete 17000 International Runs) आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. त्याने या धावा करण्यासाठी एकूण 438 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो चांगल्या लयीत दिसत आहे. त्याने पहिल्या कसोटीत वादळी 120 धावांची शतकी खेळीही साकारली होती.

𝗔 𝗱𝗮𝘆 𝗳𝘂𝗹𝗹 𝗼𝗳 𝗺𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲𝘀!

Congratulations to #TeamIndia 🇮🇳 captain @ImRo45 on reaching 1⃣7⃣0⃣0⃣0⃣ runs in international cricket 👏👏 pic.twitter.com/CZ8vYpHmGe

— BCCI (@BCCI) March 11, 2023

दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान
रोहित शर्मा भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात 17000हून अधिक धावा करणारा सहावा फलंदाज आहे. त्याने एमएस धोनी (MS Dhoni) याची बरोबरी केली आहे. धोनीने 535 सामन्यात 17092 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, वीरेंद्र सेहवाग याचा रेकॉर त्याने मोडला आहे. कारण, सेहवागच्या नावावर 363 सामन्यात 16892 धावा आहेत.

भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्याने 664 सामन्यात 34357 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याने 494 सामन्यात 25106 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या राहुल द्रविड याने 504 सामन्यात 24064, तर चौथ्या स्थानी असलेल्या सौरव गांगुली याने 421 सामन्यात 18433 धावा केल्या आहेत.

भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर- 34357 धावा
विराट कोहली- 25047 धावा
राहुल द्रविड-24064 धावा
सौरव गांगुली- 18433 धावा
एमएस धोनी- 17092 धावा
रोहित शर्मा- 17009 धावा

तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळलाय भारतासाठी
रोहित शर्मा याने त्याच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तो लांब षटकार मारण्यासाठीही प्रसिद्ध आहे. भारतात त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळते. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी खेळलेल्या 48 कसोटीत 9 शतकांच्या मदतीने 3344 धावा केल्या आहेत. तसेच, 241 वनडे सामन्यात 30 शतकांसह 9782 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 148 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 4 शतकांसह 3853 धावा केल्या आहेत. (skipper rohit sharma completed 17000 international run equal ms dhoni and leave behind virender sehwag)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार स्मिथला विराटच्या बॅटवर संशय? ड्रिंक्स ब्रेकदरम्यान धावत येऊन तपासली बॅट, फोटो व्हायरल

वन वुमन शो! 10 चौकार आणि 5 षटकारांसह शफालीने मैदानावर आणले वादळ


Next Post
Virat-Kohli-And-Ravindra-Jadeja

टीम इंडियाने पार केला 300 धावांचा टप्पा, विराट-जडेजाच्या भागीदारीला पूर्णविराम; जड्डू 28 धावांवर तंबूत

Shubman-Gill-And-Virat-Kohli

युवा शुबमनने शतक ठोकताच विराटलाही झाला प्रचंड आनंद, 'किंग' कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद

Rishabh-Pant-And-Nathan-Lyon

चाहत्यांनी पंतच्या नावाचा गजर करत लायनला दाखवली भीती, मैदानात नारे लागताच स्पिनरची पडली मान आणि...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143