Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय कर्णधाराने घेतलेल्या ‘या’ रिव्ह्यूवर पंचांनाही आवरेना हसू, व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

भारतीय कर्णधाराने घेतलेल्या 'या' रिव्ह्यूवर पंचांनाही आवरेना हसू, व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

March 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
IND-vs-AUS

Photo Courtesy: Twitter/Anna24GhanteCh2


चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2, तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला आहे. पहिल्या तिन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियाला संघर्ष करावा लागला. मात्र, चौथ्या कसोटीत त्यांनी पहिल्या तिन्ही सामन्यांचा हिशोब बरोबर केला. अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 480 धावांचे आव्हान उभे केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांनी शतकी खेळी साकारली. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला रोखताना भारतीय गोलंदाजांची दमछाक झाल्याचे दिसले. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने असा काही रिव्ह्यू घेतला, ज्यामुळे पंचदेखील हसू रोखू शकले नाहीत. आता व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे.

ख्वाजा आणि ग्रीन पडले भारतीय गोलंदाजांवर भारी
या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना विकेट्स घेण्यात खूपच संघर्ष करावा लागला. उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आणि कॅमरून ग्रीन (Cameron Green) यांनी भारतीय गोलंदाजांना खूपच सतावले. सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करण्याची कोणतीच संधी गमवायची नव्हती.

भारतीय संघाचा विचित्र रिव्ह्यू
मात्र, या सामन्याच्या 128व्या षटकादरम्यान वेगळंच काहीतरी पाहायला मिळालं. या षटकात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने उस्मान ख्वाजा याला वाईड ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला. चेंडू थेट ख्वाजाच्या कोपराला जाऊन लागला. चेंडू आऊट साईडच्या ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि ख्वाजाने कोणताही शॉट मारण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

pic.twitter.com/eMxKD9khgT

— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) March 10, 2023

या विचित्र रिव्ह्यूची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्येही रंगली. रिव्ह्यू घेतल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले रवी शास्त्री, मॅथ्यू हेडन आणि दिनेश कार्तिक यांनी मजेशीर अंदाजात म्हटले, “असे वाटतंय की, भारतीय खेळाडू हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, तिसरे पंच सावध आहेत की नाहीत.”

खरं तर हा निर्णय भारताच्या विरोधात गेला. त्यामुळे भारताला हा रिव्ह्यू गमवावा लागला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर रोखले. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 10 षटकात नाबाद 36 धावा केल्या. (ind vs aus 4th test indian captain took such a review on which even the umpire was forced to laugh)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL गाजवतेय पाटलांची श्रेयंका! IPL सामना पाहताना ‘या’ दिग्गजामुळे झालेली प्रभावित
इथे-तिथे, यहां-वहां, फक्त धोनीचीच हवा! कट्टर फॅनने लग्नाच्या पत्रिकेवर छापला माहीचा फोटो, पाहिला का?


Next Post
Ravi Shastri Admired Indian Youngsters

रोहितच्या 'त्या' निर्णयाने संतापले शास्त्री! म्हणाले, "उमेश-शमी तितके तरूण नाहीत आणि तुम्ही..."

Masaba-Gupta-And-Pandya-Brothers

हार्दिक अन् कृणालने घरात खेळले क्रिकेट, व्हिडिओ पाहून विवियन रिचर्ड्स यांची मुलगी म्हणाली, 'मला तर...'

Virat-Kohli

हीच ती वेळ! खराब फॉर्ममधून चाललेल्या विराटबाबत दिग्गजाचे लक्षवेधी वक्तव्य

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143