भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघही या आव्हानाचा जोमाने पाठलाग करत आहे. मात्र, यादरम्यान भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले आहे. तसेच, दाखवून दिले आहे की, फक्त वनडे आणि टी20तच नाही, तर विराटची बॅट कसोटीतही चांगलीच तळपते.
विराट कोहली (Virat Kohli) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 241 चेंडूंचा सामना करताना 100 धावा करत शतक ठोकले. या धावा करताना त्याने 5 चौकारही मारले. विशेष म्हणजे, हे विराटचे कसोटीतील 28वे शतक ठरले. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचे हे 75वे शतक होते.
https://twitter.com/ICC/status/1634815031123607552
विराट कोहली याने शेवटचे शतक 3 वर्षे 3 महिने आणि 20 दिवसांपूर्वी म्हणजेच, 22 नोव्हेंबर, 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झळकावले होते. त्यावेळी त्याने 136 धावांची खेळी साकारली होती. विराटच्या या शतकामुळे टीकाकारांचीही बोलती बंद झाली आहे.
विराट कोहलीची कारकीर्द
विराट कोहली याने या कसोटीपूर्वी भारताकडून 107 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 48.12च्या सरासरीने 8230 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 27 शतके आणि 28 अर्धशतके चोपली होती. आता यामध्ये आणखी एक शतकाचा समावेश झाल्यामुळे कसोटीत त्याच्या नावावर 28 शतके नोंदवली गेली.
याव्यतिरिक्त विराटच्या वनडे आणि टी20 कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 271 वनडे सामने खेळताना 57.69च्या सरासरीने 12809 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 46 शतके आणि 64 अर्धशतकेही केली. याव्यतिरिक्त टी20त त्याने 115 सामन्यात 52.73च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. आता त्याची तिन्ही क्रिकेट प्रकारातील एकूण शतकांची बेरीच ही 75 झाली आहे. अशाप्रकारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा सचिन तेंडुलकर (100) याच्यानंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. (Virat Kohli hit test century after 3 years against australia 4th test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाहत्यांनी पंतच्या नावाचा गजर करत लायनला दाखवली भीती, मैदानात नारे लागताच स्पिनरची पडली मान आणि…
युवा शुबमनने शतक ठोकताच विराटलाही झाला प्रचंड आनंद, ‘किंग’ कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद