क्रिकेटप्रेमींना रविवारी (दि. 7 मे) डबल हेडर सामन्याचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. आयपीएल 2023चा 51वा सामना गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरातने 56 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह गुजरात संघाने गुणतालिकेतील अव्वलस्थान आपल्याकडेच कायम राखले. गुजरातने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 200 धावांचा टप्पा पार केला होता. यामध्ये सलामीवीर वृद्धिमान साहा याने मोलाचे योगदान दिले होते. साहाची वादळी फलंदाजी पाहून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली यानेही प्रतिक्रिया दिली.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) डावाची सुरुवात करण्यासाठी सलामीला उतरला होता. फलंदाजीला उतरताच साहाने पहिल्या षटकापासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. साहाने लखनऊविरुद्ध दमदार फलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने यावेळी 43 चेंडूत 81 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. यामध्ये 4 षटकार आणि 10 चौकारांचाही समावेश होता. साहाची ही खेळी पाहून विराट कोहली (Virat Kohli) स्वत:ला त्याची प्रशंसा करण्यापासून रोखू शकला नाही.
यावेळी विराटने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर साहाचा फोटो शेअर केला. यासोबतच त्याने कॅप्शन देत “काय खेळाडू आहे,” असे लिहिले. आता विराटच्या या स्टोरीचे स्क्रीनशॉट्स सर्वत्र व्हायरल होत आहेत.
Virat Kohli enjoying the batting of Saha. pic.twitter.com/64f0WQLImF
— Johns. (@CricCrazyJohns) May 7, 2023
दुसरीकडे, साहाच्या खेळीवर विराटने प्रतिक्रिया दिल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरीही मजा घेऊ लागले. नेटकरी म्हणत आहेत की, विराट कोहलीचे लखनऊच्या खेळाडूंसोबत वाद झाले होते. त्यामुळे विराट लखनऊच्या गोलंदाजांची धुलाई होताना पाहून खुश झाला आहे.
Gambhir ki team ko pelega to Kohli jee story to dalenge hi 😜😀
— लोटन कबूतर🕊️ (@xcuse_myenglish) May 7, 2023
Saha toh bahana hai ..Gauti ko jo chidana hai.
— Naveen (@_naveenish) May 7, 2023
Kohli ji khud saha ke roop leke aaye hai gambhir ke khilaf 🥵🥵🔥🔥
— RCB Wala (Anti Thala) (@Lame_Posting) May 7, 2023
सामन्याचा आढावा
साहाने शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासोबत 12.1 षटकात 142 धावांची सलामी भागीदारी रचली. त्याने गुजरातसाठी सर्वात वेगवान अर्धशतकही झळकावले. साहाने या सामन्यात अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. साहा (81) आणि गिल (94*) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 2 विकेट्स गमावत 227 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघ 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना गुजरातने 56 धावांनी जिंकला. (cricketer virat kohli reacts on wriddhiman saha innings in gt vs lsg match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अहमबादेत लखनऊची धूळधाण, गुजरातच्या 228 धावांचा पाठलाग करताना टाकल्या नांग्या
सुपरमॅनलाही मागे टाकणारी चपळता दाखवत राशिद खानने पकडला ‘कॅच ऑफ द इअर’, ‘हा’ व्हिडिओ तुम्ही सतत पाहाल