तब्बल 4 वेळा इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची ट्रॉफी जिंकणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स होय. आयपीएल 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणाऱ्या या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने मागील हंगामात तुफान प्रदर्शन केले होते. पदार्पणाच्या हंगामात गुजरातने विजेतेपद पटकावले. मात्र, आयपीएलमध्ये 4 संघ असे आहेत, ज्यांना 15 हंगाम खेळून एकदाही किताब जिंकता आला नाहीये. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा समावेश आहे.
खरं तर, लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत पदार्पण केले होते. तसेच, या संघाने मागील हंगामात प्ले-ऑफपर्यंत मजल मारली होती. केएल राहुल याच्या नेतृत्वातील हा संघ आता दुसरा हंगाम खेळेल. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघांनी पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये सहभाग नोंदवला आहे. मात्र, त्यांना अद्याप एकदाही किताब जिंकता आला नाहीये. आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत या चार संघाना अपेक्षा असेल की, त्यांच्या किताबाचा दुष्काळ संपावा. आता हे संघ कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या चार संघांकडे किताब जिंकण्याची क्षमता आहे. कोणाकडे धाकड फलंदाज आहेत, तर कोणाकडे पॉवर हिटर खेळाडूंची फौज आहे. जर या हंगामात चारही संघाच्या खेळाडूंनी धमाल कामगिरी केली, तर स्पर्धेलाही नवीन विजेता मिळू शकतो.
पंजाब किंग्सकडे पॉवर हिटर
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडे पॉवर हिटरसोबतच चांगले वेगवान गोलंदाजही आहेत. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला सॅम करन (18.5 कोटी) पंजाब संघाची मोठी ताकद आहे. करन गोलंदाजीसह फलंदाजीतही दम दाखवू शकतो. संघाकडे लियाम लिव्हिंगस्टोन यासारखाही पॉवर हिटर फलंदाज आहे. तसेच, पंजाब संघ आयपीएल 2023मध्ये शिखर धवन या नवीन कर्णधारासोबत उतरणार आहे.
आरसीबी संघाकडे विराट, फाफसारख्या धाकड खेळाडूंचा भरणा
आरसीबी (RCB) संघाकडे विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांसारखे धाकड खेळाडू आहेत. तसेच, संघात वनिंदू हसरंगा यासारखा शानदार फिरकीपटूही आहे. मात्र, संघाला 15 हंगामात एकदाही किताब जिंकता आला नाहीये. संघाकडे मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवूड यांसारखे वेगवान गोलंदाजही आहेत. अशात संघ संतुलित वाटत आहे. मात्र, यावेळी आरसीबी संघ किताबाचा दुष्काळ संपवतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लखनऊने पदार्पणात केलेली प्ले-ऑफमध्ये एन्ट्री
लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केले होते. केएल राहुल याच्या पदार्पणातील लखनऊ संघाने पदार्पणातच प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता. संघाकडे राहुलव्यतिरिक्त क्विंटन डी कॉक यासारखाही विस्फोटक फलंदाज आहे. सामना संपवण्याची ताकद बाळगणारा मार्कस स्टॉयनिसही संघाकडे आहे. तो चेंडू आणि बॅट दोन्ही विभागात धमाल करू शकतो.
फलंदाजीत दिल्लीकडे सर्वाधिक ताकद
डेविड वॉर्नर आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. वॉर्नरने 7 वर्षांपूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलचा किताब जिंकून दिला होता. दिल्लीकडे, रायली रुसो, रोवमन पॉवेल यांसारखे पॉवर हिटर आहेत. हे खेळाडू तुफान फॉर्ममध्ये आहेत. दिल्लीकडे यावेळी वेगवान गोलंदाजांचाही फौज आहे, जे कोणत्याही संघाच्या फलंदाजी फळीला उद्ध्वस्त करू शकतात. अशात दिल्ली आयपीएल किताबाचा दुष्काळ संपवतो की नाही, हे पाहावे लागेल. (cricketer virat kohli royal challengers bangalore delhi capitals punjab kings that never won ipl trophy this time may win title)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी अहमदाबादमध्ये पाऊस, पहिल्या सामन्यावर काय होणार परिणाम?
GTvsCSK । गुजरात-चेन्नईचे महत्वाचे खेळाडू अनुपस्थितीत, ‘अशी’ आहे संभावित प्लेइंग इलेव्हन






