इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी (दि. 18 मे) पार पडलेला 65वा सामना क्रिकेटप्रेमी काय आठवणीत ठेवतील. कारण, ही आयपीएल इतिहासातील पहिलीच वेळ होती, जेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकाच सामन्यात शतक झळकावले. हैदराबादकडून हेन्रीच क्लासेन याने वादळी शतक झळकावले, तर आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली यानेही आयपीएलमधील तडाखेबंद 6वे शतक साजरे केले. विशेष म्हणजे, विराट कोहली 18 मे रोजी एक खास विक्रमही करून गेला. त्याबाबत आपण जाणून घेऊयात…
आयपीएल 2023 स्पर्धेच्या प्ले-ऑफ शर्यतीत कायम राहण्यासाठी सातत्याने दावा ठोकत असलेल्या आरसीबी संघाने हैदराबाद संघाविरुद्ध नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी हेन्रीच क्लासेन याच्या वादळी शतकाच्या जोरावर हैदराबादने बेंगलोरपुढे 5 विकेट्स गमावत 186 धावा करत 187 आव्हान ठेवले होते. विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या 172 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बेंगलोरने सहज विजय मिळवला. यावेळी विराटच्या शतकाच्या आणि फाफच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 19.2 षटकात 2 विकेट्स गमावत 187 धावा करून विजय साकारला.
विराटचा विक्रम
हैदराबादविरुद्ध 62 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडत विराट कोहली याने त्याचे खणखणीत शतक झळकावले. 18 मे रोजी आरसीबी संघाच्या या धुरंधराने शतक केले. विशेष म्हणजे, यापूर्वी विराटने 18 मे, 2016 रोजीही आयपीएलमध्ये शतक केले होते.
विराट कोहली आणि 18 नंबर
विराट कोहली आणि 18 नंबर यांचे खूपच जवळचे नाते आहे. विराटचा जर्सी नंबरही 18 आहे. तसेच, 18 मे, 2023 रोजी 4 वर्षांपासून सुरू असलेल्या आयपीएल शतकाचा दुष्काळही विराटने संपवला. या सामन्यात विराट 100 धावा करून तंबूत परतला. 18 मे, 2016 रोजी विराटने पंजाब किंग्सविरुद्ध 113 धावांची वादळी खेळी साकारली होती.
विराटने 2016 मध्ये जी 113 धावांची खेळी केली होती, त्यात त्याचा हात खूपच दुखापतग्रस्त झाला होता. हातावर जखमा झाल्यानंतर आरसीबीच्या या दिग्गजाने 9 टाके लावले होते. या कठीण स्थितीत आराम करण्याऐवजी आपल्या संघासाठी विराटने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि धमाकेदार शतक झळकावले. (cricketer virat kohli scores ipl century 113 runs from 50 balls against punjab kings in 2016 in ipl on 18 may)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमी शतकानंतर भरभरून बोलला विराट, हैदराबादच्या प्रेक्षकांचे ‘या’ गोष्टीसाठी मानले आभार
हैदराबादला हरवत आरसीबी फ्लेऑफ रेसमध्ये कायम, शतकवीर विराटचे अनेक विक्रम