भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघाने दाणादाण उडवली आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 2-0ने पुढे आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर 1 ते 5 मार्चदरम्यान खेळला जाणार आहे. त्यानंतर चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे 9 मार्चपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकला नव्हता. मात्र, त्याने महत्त्वाचे योगदान नक्की दिले. अशातच विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक चाहती विराटला किस करताना दिसत आहे. मात्र, यामागील सत्यता वेगळीच आहे.
खरं तर, एका महिला चाहतीने विराट कोहली (Virat Kohli) याच्या मेणाच्या पुतळ्याला किस केले आहे. विराटचा पुतळा मॅडम तुसाद म्युझिअममध्ये लावण्यात आला आहे. एक महिला चाहती, जेव्हा तिथे गेली, तेव्हा ती विराटप्रती तिचे प्रेम व्यक्त करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. महिला चाहतीने विराटच्या पुतळ्याला किस (Women Fan Kiss Virat Statue) करतानाचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी पाठिंबाही दिला. काही चाहत्यांनी असेही म्हटले की, असे केल्यामुळे पुतळा खराब होतो.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) February 20, 2023
चार वर्षांपासून शतकाचा दुष्काळ
विराट कोहली हा कसोटीत नोव्हेंबर, 2019नंतर एकदाही शतक झळकावू शकला नाहीये. क्रिकेटचा सर्वात मोठ्या प्रकारात चाहत्यांना त्याच्या शतकाची प्रतीक्षा आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू मालिकेतील तीन डावात 12, 44 आणि 20 धावांचे योगदान दिले आहे. त्याने 106 कसोटी सामन्यांच्या 180 डावांमध्ये 8195 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 शतके आणि 28 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे.
पुढील सामन्यांचे वेळापत्रक
रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कसोटीत कोणताही बदल केलेला नाहीये. पहिल्या दोन कसोटीसाठी जो संघ होता, त्याच संघासोबत भारत मैदानावर उतरणार आहे. फक्त यात एक बदल असा आहे की, केएल राहुल याच्या नावापुढे उपकर्णधारपद होते, ते काढून टाकले आहे. पहिल्या दोन कसोटीत राहुलच्या नावापुढे उपकर्णधार लिहिले होते. अशात उर्वरित दोन कसोटीसाठी रोहित संघाचे नेतृत्व करेल. (cricketer virat kohli video fan publicly kiss virat statue video viral on social media read more)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला ‘बापमाणूस’, बाळाचं नावही केलं जाहीर
भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज