भारतीय क्रिकेटपटू नेहमीच टीव्ही शोमध्ये हजेरी लावत असतात. यादरम्यान ते अनेक मजेशीर गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. नुकतीच माजी भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. विशेष म्हणजे कैफ पहिल्यांदाच या शोमध्ये हजेरी लावत आहे, तर सेहवागन अनेकदा शोमध्ये पाहुणा म्हणून आला आहे. शोमध्ये कपिल शर्माने यावेळी खुलासा केला की, क्रिकेटपटूंनी कोणत्या मुलींशी आणि का लग्न केले? यामध्ये सेहवागबाबत एक मजेशीर गोष्ट समोर आली आहे.
सेहवागने खुलासा करत सांगितले की, तो देखील अशा क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या पत्नींकडून आपली इंग्रजी सुधारण्यासाठी लग्न केले आहे. यावर सेहवागने दिग्गज माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांचेही नाव घेतले. (Cricketer Virender Sehwagh Says He Married His Wife Aarti To Improve His English Says Kapil Dev Did)
https://www.instagram.com/p/CUPmsOJKC9r/?utm_source=ig_web_copy_link
कपिलने सेहवागला आठवण करून देत म्हटले की, त्याने एकदा म्हटले होते की, त्याचे सहकारी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी आपापल्या पत्नींशी आपली इंग्रजी सुधारण्यासाठी लग्न केले होते. कपिल म्हणाला की, “वीरू भाईने पहिल्यांदा खूपच चांगले उत्तर दिले. म्हणाले होते, पाहा, मी, भज्जी किंवा युवी, आम्ही अशा मुलींशी लग्न केले, ज्यांच्यामुळे आमची इंग्रजी भाषा सुधारेल.”
कपिलने या किस्स्याची आठवण करून दिल्यानंतर सेहवाग म्हणाला की, “हो… त्यामध्ये कपिल पाजींचाही (कपिल देव) समावेश होता.” सेहवागने हे वक्तव्य करताच, सर्वत्र हशा पिकल्या.
कपिल देव यांनी रोमी देव यांच्याशी लग्न केले आहे. सेहवागचे लग्न आरती अहलावतशी झाले आहे. ही जोडी सन २००४ मध्ये लग्नबंधनात अडकली होती. यादरम्यान हरभजन सिंगने अभिनेत्री गीता बसराशी लग्न केले आहे. नुकतेच हरभजन आणि गीता एका मुलाचे आई-बाबा झाले आहेत. हरभजनप्रमाणे युवराज सिंगनेही सन २०१६ मध्ये अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न केले होते.
विशेष म्हणजे या शोमध्ये सेहवाग आणि कैफ यांनी आपल्या क्रिकेटच्या दिवसांतील ड्रेसिंग रूममधील मस्तीचे अनेक किस्से शेअर केले. कैफने खुलासा केला की, सेहवागने त्याला आणि युवराजला एका मालिकेसाठी निवड झाल्यानंतर टोमणा मारला होता. त्यांना संघात सामील केले नव्हते.
कैफने पुढे हेही सांगितले की, सेहवागने गाणे गाऊन त्याला टोमणा मारला होता. सेहवाग गाणे गात होता की, “कैसे कैसे को दिया है, ऐसे वैसों को दिया है. हमको भी तो लिफ्ट करा दे.”
हा किस्सा ऐकून सर्व लोक जोरजोराने हसू लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच
-ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष






